जिनिव्हा, 02 जून : कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) जगभरातील 62 लाख 59 हजार 887 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 3 लाख 75 हजार 208 लोकांचा मृत्यू झाला आहे. अद्याप कोरोनावर लस किंवा ठोस उपचार करणारी औषध नाही आहेत. मात्र सध्या सर्वच देश कोरोनावर उपचार करण्यासाठी अॅंटीबायोटिक्सचा वापर करत आहेत. मात्र आता जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) कोरोनावर उपचारासाठी अॅंटीबायोटिक्सचा जास्त वापर धोकादायक ठरू शकतो असे सांगितले आहे. WHOनं म्हटलं आहे की अँटीबायोटिक्सच्या अधिक वापरामुळे बॅक्टेरियाची रोगप्रतिकार शक्ती वाढत आहे आणि यामुळे जास्त लोकांचा मृत्यू होऊ शकतो. theguardian.com च्या रिपोर्टनुसार, WHOचे संचालक टेड्रोस अॅडॅनॉम गेब्रेयसिस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी सांगितले, या आजारावर उपचार करणार्यार औषधांविरूद्ध बॅक्टेरियाची प्रतिकारशक्ती वाढत आहे. कोव्हिड -19वर साथीच्या रोगामुळे अँटीबायोटिक्सचा वापर वाढत आहे, त्यामुळं हळुहळु बॅक्टेरिया या औषधांच्या प्रति अधिक शक्तीशाली होऊ शकतात. अशा परिस्थितीत, कोरोनामुळं आणि आगामी काळात बॅक्टेरियामुळे होणारे रोग जीवघेणे ठरू शकतात. वाचा- कोरोनाला हरवलं पण बाळ गमावलं, उपचाराविना 20 तास वेदना सहन करत होती महिला पण… बॅक्टेरियामुळे टीबी आणि न्यूमोनिया होण्याचा धोका दरम्यान बॅक्टेरिया मोठी हानी पोहोचवत नाहीत, मात्र रोगास कारणीभूत असणाऱ्या बॅक्टेरियांमध्ये काही विषारी घटक असतात ज्यांना अॅनडोटॉक्सिन आणि अॅक्सोटॉक्सिन म्हणतात. बॅक्टेरियामुळे मेंदुज्वर, न्यूमोनिया, टीबी किंवा क्षयरोग आणि कॉलरासारखे रोग पसरू शकतात. अँटीबायोटिक्सचा शोध लागण्यापूर्वी जगात टीबी, न्यूमोनिया आणि कॉलरामुळे दरवर्षी हजारो मृत्यू होत होते. न्यूमोनियामुळे फुफ्फुसात संसर्ग होतो याशिवाय टीबीचा उपचार करण्यासाठी अँटीबायोटिक्सचा वापर केला जातो. कॉलेरा हा एक आतड्यांसंबंधी संसर्ग आहे जो विब्रिओ कॉलराच्या जीवाणूमुळे होतो. हे दूषित अन्न आणि पाण्याने पसरतो. वाचा- पहिल्यासारखा धोकादायक नाही राहिला कोरोनाव्हायरस? WHOनं दिले उत्तर भारत वापरणार रेमडेसिवीर औषध सध्या साऱ्या जगाचे लक्ष अँटी-व्हायरल औषध रेमडेसिवीरकडे आहे. सध्या याची चाचणी वेगवेगळ्या टप्प्यात सुरू आहे. फेज तीनच्या निकालानुसार, 65 टक्के रुग्णांमध्ये या औषधाच्या वापराने 11व्या दिवशी चांगली स्थिती दर्शविली. गेल्या महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार डॉ. फॉसी यांनी या औषधाचे चांगले, प्रभावी आणि सकारात्मक परिणाम दिसत असल्याचं सांगितलं. डॉ. फोसे म्हणाले की, अमेरिका, युरोप आणि आशिया मधील 68 ठिकाणी रेमडेसिवीरची चाचणी घेण्यात आली, यात हे दिसून आले की, रेमडेसिवीर औषध कोरोनाला रोखू शकतं. भारतातही रेमडेसिवीर वापरण्याबाबत सरकारनं मान्यता दिली आहे. वाचा- कोरोनाला हरवण्याचा उपाय मिळाला! रुग्णांना देणार अमेरिकेहून मागवलेले ‘हे’ औषध कोरोना रोखण्यासाठी मास्कचं उपयोगी अमेरिकेतील एका संशोधनात असे दिसून आले आहे की मास्कचा वापर करणं आणि सामाजिक अंतराचे पालन करणं कोरोना विषाणूचा प्रसार होण्यास प्रभावी उपाय आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की एन-95 मास्क कोरोना रोखण्यासाठी सर्वात प्रभावी ठरू शकतो. सोमवारी प्रसिद्ध झालेल्या या संशोधनात असे सांगितले गेले आहे की दोन लोकांमधील कोरोना संसर्गाची शक्यता एक मीटर किंवा तीन फूट अंतर कमी करते, जरी दोन मीटर पर्यंत अंतर राखणे जास्त चांगले असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.