रोम, 02 जून : कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) जगभरातील 62 लाख 59 हजार 887 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 3 लाख 75 हजार 208 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासगळ्यात इटलीच्या (Italy) एका डॉक्टरांनी असा दावा केला आहे की, कोरोनाव्हायरस आता कमकुवत होत आहे, पहिल्यासारखा हा व्हायरस धोकादायक नाही आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) हे दावे फेटाळले आहेत. तसेच लोकांनी नेहमीप्रमाणे काळजी घेणे आवश्यक असल्याचंही म्हंटलं आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात इटलीमध्ये मोठ्या संख्येनं लोकांचा मृत्यू झाला. इटलीमध्ये आतापर्यंत 33 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, मात्र नवीन रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.
मिलानच्या सॅन राफेल हॉस्पिटलचे मुख्य डॉक्टर अल्बर्टो जंग्रिलो म्हणतात की, क्लिनिकली व्हायरस आता इटलीमध्ये नाही आहे. हे रुग्णालय लॉम्बार्डी शहरात आहे जिथं 16 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. इटलीच्या RAI या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत डॉक्टर अल्बर्टो म्हणाले की, 'गेल्या 10 दिवसांत झालेल्या स्वॅब टेस्टमध्ये व्हायरसचे प्रमाण खूप कमी आहे. एक किंवा दोन महिन्यांपूर्वीच्या तुलनेत हे प्रमाण बरेच कमी झाले आहे. ते म्हणाले की संक्रमणाच्या दुसर्या टप्प्याबाबत काही तज्ज्ञ चिंतित आहेत आणि नेत्यांनी ते गांभीर्याने घेतलं पाहिजे.
वाचा-कोरोनाला हरवण्याचा उपाय मिळाला! रुग्णांना देणार अमेरिकेहून मागवलेले 'हे' औषध
WHOने फेटाळला दावा
जेनोआ येथील सॅन मार्टिनो हॉस्पिटलमधील संसर्गजन्य आजारांचे प्रमुख, माशिओ बसेटी यांनी असे म्हंटले आहे की, दोन महिन्यांपूर्वी हा विषाणू आता इतका शक्तिशाली होता. तितका आता नाही आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) हे दावे फेटाळले आहेत. WHOचे असे म्हणणे आहे की, अशा प्रकारच्या समजुती पसरवू नये की व्हायरस अचानक स्वतःच कमकुवत झाला आहे. तरीही आपण सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
वाचा-कोरोनाचा उद्रेक: अमेरिकेत पुढच्या 30 दिवसांमध्ये होऊ शकतात 20 हजार मृत्यू
कोरोनाच्या संकटानंतर इटलीनं आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी लॉकडाऊनमध्ये सूट दिली आहे. इटलीमधील सर्व विमानतळं 3 जून पासून खुली करण्यात येतील. मात्र केवळ सामानांच्या आयातीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अद्याप प्रवाशांसाठी हा निर्णय घेण्यात आलेला नाही.
वाचा-भारतात एका महिन्यात 5 पटीने वाढले कोरोनाचे रुग्ण, जून असेल अधिक धोकादायक