कानपूर, 02 जून : देशात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. आतापर्यंत 2 लाखांच्या जवळ कोरोनाबाधितांचा आकडा गेला आहे. वृद्ध, लहान मुलं आणि गरोदर महिला यांना कोरोनाचा जास्त धोका आहे. या सगळ्यात रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळं एक धक्कादायक घटना कानपूर इथं घडली. कानपूरच्या हॅलेट हॉस्पिटलमध्ये (Hallet Hospital) एक गरोदर महिला तब्बल 20 तास वेदनेत तडफडत होती. यावेळी, उपस्थित डॉक्टरांनी कोरोना संशयित म्हणून रिपोर्ट आल्याशिवाय महिलेवर उपचार करण्यास नकार दिला. ही महिला 7 महिन्यांची गरोदर होती, मात्र रात्री अचानक बाळाची हालचाल थांबल्यामुळं महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कुटुंबियांनी विनवणी केल्यानंतर या महिलेवर उपाचर सुरू करण्यात आले. मात्र रात्रभर प्रसुतीच्या वेदनेने या महिलेची प्रकृती नाजूक होती. हॅलेट या खासगी रुग्णालयात सुविधा नसल्यामुळं तिला दुसऱ्या रुग्णालयात जाण्यास सांगण्यात आलं. दरम्यान महिलेच्या वडिलांनी त्यांच्या मुलीला कोरोना संशयित मानून कोरोना वॉर्डमध्ये दाखल केल्याचं सांगितलं. तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी सांगितले की कोरोना रिपोर्ट आल्याशिवाय महिलेवर उपचार होणार नाहीत. ही महिला रात्रभर वेदनांनी विहळत होती. मात्र डॉक्टरांनी उपचार केले नाहीत. बराच वेळानंतर डॉक्टरांनी वेदना कमी करणारे इंजेक्शन दिले. वाचा- Coronavirus : देशात 2 लाखांपर्यंत पोहोचला कोरोनाचा आकडा, ही आहे ताजी आकडेवारी अखेर दुपारी दीड वाजता महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आला, त्यानंतर डॉक्टरांनी प्रसूतीची तयारी केली. मात्र प्रसूतीनंतर बाळाचा पोटातच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. महिलेला ही माहिती मिळताच तिची तब्येत आणखी बिघडली. रुग्णालयातील उपस्थित कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप महिलेचे वडील कमलेश यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाबद्दल, जच्चा-बच्चा रुग्णालयाचे महिला विभागाचे प्रमुख डॉ. किरण पांडे यांचे म्हणणे आहे की, उपचारामध्ये कोणताही निष्काळजीपणा नव्हता. हे आरोप निराधार आहेत, हे प्रकरण गुंतागुंतीचे होते. वाचा- पहिल्यासारखा धोकादायक नाही राहिला कोरोनाव्हायरस? WHOनं दिले उत्तर वाचा- कोरोनाला हरवण्याचा उपाय मिळाला! रुग्णांना देणार अमेरिकेहून मागवलेले ‘हे’ औषध
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.