जिनिव्हा, 18 जून : देशात एकीकडे कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना, अद्याप लस किंवा औषध मिळाले नाही आहे. सर्वच देश कोरोनावर लस किंवा औषध शोधण्यासाठी ट्रायल करत आहे. यातच जागतिक आरोग्य संघटनेने मात्र कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरलं जाणारं मलेरियाचे औषध हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या (hydroxychloroquine) ट्रायलवर बंदी घातली आहे. ट्रायलचे कार्यकारी समुह आणि मुख्य अभ्यासक यांनी सॉलिडॅरिटी ट्रायल, ब्रिटनमधील रिकव्हरी ट्रायल आणि अन्य पुरावे लक्षात घेऊन चाचणी हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी सायन्स जनर्ल ‘द लान्सेट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानंतर HCQ चाचणीवर बंदी घालण्यात आली होती पण नंतर ही बंदी मागे घेण्यात आली. मृत्यूदरावर परिणाम नाही WHO च्या म्हणण्यानुसार सॉलिडॅरिटी ट्रायल आणि ब्रिटनमधील रिकव्हरी ट्रायल यांच्यात हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधांमुळं कोव्हिड-19चा मृत्यूदर कमी झालेला आढळून आला नाही. त्यामुळं या औषधाचा ट्रायल थांबवण्यात आला आहे. दरम्यान ज्या रुग्णांवर याआधीच HCQ चा कोर्स सुरू आहे, त्यांना हे औषध वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. वाचा- Diabetes, BP असलेल्या लोकांसाठी कोरोना धोकादायक, मृत्यूचा धोका 12 पट जास्त केवळ सॉलिडॅरिटी ट्रायलवर बंदी संघटनेने स्पष्ट केले आहे की हा निर्णय फक्त सॉलिडॅरिटी ट्रायलवरशी संबंधित आहे आणि संसर्ग होण्यापूर्वी किंवा नंतर रुग्णांना देण्यास बंदी नाही. यापूर्वी लॅंसेट अभ्यासामध्ये असा दावा केला जात होता की HCQमुळे रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढते. त्यानंतर WHOने ड्रग टेस्टिंगवर बंदी घातली. वाचा- देशात पुन्हा Lockdown लागणार का? पतंप्रधान मोदींनी दिलं हे उत्तर याआधीही थांबवलं होतं ट्रायल WHO च्या या निर्णयाला तीव्र विरोध झाला. असा निर्णय घेण्यापूर्वी भारताने WHO ला एक पत्रही लिहिले होते की त्यांनी ICMRशीही बोलले पाहिजे. भारतातील सर्वात जास्त कंपन्या या HCQ तयार करतात. अमेरिकेनं केलेल्या मागणीनंतर भारतानं या औषधाच्या निर्यातीवरची बंदी हटवली होती. वाचा- कहर! आरोग्यमंत्रीही कोरोनाच्या विळख्यात; रिपोर्ट आला पॉझिटिव्ह संपादन-प्रियांका गावडे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.