कोरोनाच्या दहशतीत भारताला दिलासा! चार दशकांत जे झालं नाही ते आता घडलं

कोरोनाच्या दहशतीत भारताला दिलासा! चार दशकांत जे झालं नाही ते आता घडलं

चार दशकांत पहिल्यांदाच भारतात कार्बन उत्सर्जनाचं (carbon emission) प्रमाण कमी झालं आहे. 

  • Share this:

नवी दिल्ली, 14 मे : कोरोनाच्या दहशतीत दिलासादायक अशा बातम्याही येत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला मात्र त्याचा पर्यावरणावर चांगला परिणाम होतो आहे. नद्यांचं पाणी स्वच्छ निर्मळ होतं आहे, ओझोनचा थरही पूर्ववत होत आहे आणि आता भारतात चार दशकात जे झालं नाही ते पाहायला मिळतं आहे. भारतात कार्बन डायऑक्साइडचं (CO2) प्रमाण कमी झालं आहे.

कार्बन ब्रीफच्या रिपोर्टनुसार, भारतात 1982 नंतर पहिल्यांदाच लक्षणीय प्रमाणात कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण कमी झालं आहे. Centre for Research on Energy and Clean Air (CREA) ने हा अभ्यास केला आहे. 2019-20 या मार्च महिन्याच्या अखेरीस कार्बन उत्सर्जन 15 टक्क्यांनी कमी झालं आहे.

हे वाचा - Indian Railway ने लॉकडाऊनमध्येही दोन दिवसात 7 लाख 90 हजार प्रवासी पोहोचले गावी

मात्र हे फक्त लॉकडाऊनमुळे नाही, असंही या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

रिपोर्टमध्ये नमूद केल्यानुसार भारतात लॉकडाऊनपूर्वी विजेचा वापर कमी झाला होता. नूतनीकरणक्षम ऊर्जेचा वापर वाढला आणि त्यामुळे पारंपारिक ऊर्जेची मागणी कमी झाली. यानंतर लॉकडाऊन लागू करण्यात आला आणि 40 वर्षांत पहिल्यांदाच भारतात कार्बन उत्सर्जनवाढीचा ट्रेंड बदलला.

रिपोर्टनुसार, मार्चमध्ये कोळशापासून वीजनिर्मितीचं उत्पादन 15 टक्के घटलं आणि कार्बन उत्सर्जन 15 टक्के कमी झालं आहे. एप्रिलच्या पहिल्या 3 आठवड्यात कोळशापासून वीजनिर्मिती 31 टक्के कमी झाली आहे, त्यामुळे एप्रिलपर्यंत कार्बन उत्सर्जन 30 टक्क्यांपर्यंत कमी होईल अशी आशा व्यक्त केली जाते आहे.

हे वाचा - धक्कादायक! बापलेकानं पोलिसाच्या शरीराचे केले तुकडे; शिजवून खाल्ले, खायलाही घातले

गाड्यांचा धूर, कोळशापासून वीजनिर्मिती यामधून सर्वात जास्त कार्बन उत्सर्जन होतं. हवेत कार्बन डायऑक्साइड वाढणं आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे श्वसन आणि हृदयासंबंधी समस्या उद्भवतात. विशेषत: अस्थमाचा त्रास असणाऱ्या रुग्णांसाठी कार्बन डायऑक्साइड जास्त घातक ठरू शकतं.

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: May 14, 2020, 7:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading