वॉशिंग्टन, 08 जुलै: चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोनामुळे जगभरात हाहाकार माजला आहे. कोरोनावरून चीनसोबत असलेल्या वादामुळे अमेरिकेनं जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची धमकी याआधी दिली होती. मात्र आता खरंच अमेरिकेनं औपचारिकता पूर्ण करून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. अमेरिकेचे खासदार बॉब मेनंडेझ यांनी ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, “कोरोना साथीमुळे चीनसोबत असलेल्या वादामुळे अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून अधिकृतपणे बाहेर पडली आहे. अशी माहिती कार्यलयाकडून काँग्रेसला मिळाली आहे.’’ ट्रम्प यांनी मे महिन्यातच जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची धमकी दिली होती. चीनने कोरोनाबाबत जागतिक आरोग्य संघटनेची दिशाभूल केली आहे. चीनकडून कायम गोष्टी लपवल्या जात असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. चीनला कोरोनावर उत्तर द्यावंच लागेल असंही यावेळी ट्रम्प म्हणाले. जागतिक आरोग्य संघटना चीनच्या नियंत्रणाखाली असल्याचा आरोपही यावेळी ट्रम्प यांनी केला. हे वाचा- Coronavirus हवेतून पसरू शकतो? अखेर WHO नेही घेतली पुराव्यांची दखल
Congress received notification that POTUS officially withdrew the U.S. from the @WHO in the midst of a pandemic.
— Senator Bob Menendez (@SenatorMenendez) July 7, 2020
To call Trump’s response to COVID chaotic & incoherent doesn't do it justice. This won't protect American lives or interests—it leaves Americans sick & America alone.
हे वाचा- हवेतूनही पसरू शकतो कोरोना; कसा कराल स्वत:चा बचाव चीन जागतिक आरोग्य संघटनेला केवळ 40 मिलियन पैसे देत तर अमेरिकेकडून 450 मिलियन डॉलरची मदत केली जाते. चीनकडून कमी पैसे मिळत असूनही जागतिक आरोग्य संघटनेवर त्यांचं नियंत्रण असल्याचा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. अमेरिकेत कोरोनाग्रस्तांचा आकडा 29,10,023 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 1,30,090 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे अमेरिकेतील रुग्णांचा मृत्यूचा आकडा सर्वाधिक असल्याचं सांगितलं जात आहे. अमेरिकेत कोरोनाची स्थिती अत्यंत गंभीर असल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर चीनसोबत असलेल्या कोरोनाच्या वादातून ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतला आहे.