जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / 'जगाला वाचवण्यासाठी बलिदान द्यावं लागेल'; असं म्हणत महिलेने केली मुलाची हत्या

'जगाला वाचवण्यासाठी बलिदान द्यावं लागेल'; असं म्हणत महिलेने केली मुलाची हत्या

'जगाला वाचवण्यासाठी बलिदान द्यावं लागेल'; असं म्हणत महिलेने केली मुलाची हत्या

लंडनमध्ये राहणाऱ्या ओल्गाचा मुलगा स्पेशल चाईल्ड होता आणि त्याला 24 तास सांभाळण्याची गरज असायची. या मुलाच्या मृत्यूपूर्वीचा ओल्गाचा एक ऑडिओही व्हायरल होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

लंडन, 14 फेब्रुवारी : इंग्लंडमध्ये एका 40 वर्षीय महिला वकील मानसिक समस्यांनी त्रस्त होती. तिची परिस्थिती इतकी गंभीर झाली की, तिने तिच्या 10 वर्षाच्या मुलाचा खून केला आहे. देशव्यापी लॉकडाउन लागल्यानंतर ओल्गाची स्थिती अधिक गंभीर झाली. ओल्गाचे पती डीन फ्रीमेन त्यावेळी स्पेनमध्ये होते, ज्यावेळी त्यांच्या मुलाची डिल्लन फ्रीमेनची हत्या झाली. ओल्गाची मानसिकदृष्ट्या गंभीर परिस्थिती पाहून सध्या तिला रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. आजतक ने दिलेल्या वृत्तानुसार, लंडनमध्ये राहणाऱ्या ओल्गाचा मुलगा स्पेशल चाईल्ड होता आणि त्याला 24 तास सांभाळण्याची गरज असायची. या मुलाच्या मृत्यूपूर्वीचा ओल्गाचा एक ऑडिओही व्हायरल होत आहे. या ऑडिओमध्ये ती, हे माझं काम आहे, मला जगात बॅलेन्स करण्यासाठी, जगाला वाचवण्यासाठी आपल्या मुलाचं बलिदान द्यावं लागेल, असं ती म्हणतेय. डिल्लनला मारल्यानंतर ओल्गाने स्वत:ला पोलिसांच्या हवाले केलं. हा ऑडिओ ओल्गाच्या मित्राने गुपचूप रेकॉर्ड केला होता. या प्रकरणी बोलताना मनोवैज्ञानिक डॉ. मार्टिन लॉक यांनी सांगितलं की, ओल्गा डिप्रेशनमध्ये आणि बैचन होती. कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाउनमध्ये तिची प्रकृती आणखी खराब झाली होती. तसंच मुलगा डिल्लनची शाळाही बंद झाली होती. त्यामुळे तिच्या तणावात आणखी वाढ झाली होती. रिपोर्ट्सनुसार, ओल्गाची स्थिती इतकी गंभीर झाली होती की, ती गोष्टी विसरत होती. तिला विनाकारण स्वत:वर दबाव जाणवत होता. त्यामुळे ती मानसिकदृष्ट्या गोष्टी समजू शकत नव्हती. तिने यासाठी डॉक्टरांची मदतही घेतली होती. परंतु त्याचा फायदा झाला नाही. उपचाराअभावी ओल्गाची प्रकृती खालावत गेली आणि तिची वागणूक मनोविकृत झाली. (वाचा -  YouTube वर शिकला ऑनलाईन फ्रॉड; सासूच्याच अकाउंटमधून उडवले लाखो रुपये ) डिल्लनच्या वडिलांनी डीन फ्रीमेन यांनी, ब्रॅडली कूपर आणि एमिली रात्जोस्कीसारख्या कलाकाराचं फोटोशूट केलं आहे. डीन फ्रीमेनचे वडिलही सेलिब्रिटी फोटोग्राफर होते. मुलाच्या मृत्यूने माझी अवस्था काय झाली आहे, हे शब्दात सांगू शकत नसल्याचं म्हणत त्यांनी आपल्या भावना, दु:ख व्यक्त केलं आहे. या प्रकरणी न्यायाधिशांनीही ही घटना अतिशय दुर्दैवी असून ओल्गाला मदत न मिळाल्याने लॉकडाउनमध्ये तिची प्रकृती अधिक भयानक झाल्याचं सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात