लंडन, 12 मे : कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. कोरोनामुळे मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दरम्यान, एक धक्कादायक अशी घटना समोर आली आहे. रेल्वेच्या महिला कर्मचाऱ्यावर एक प्रवासी थुंकला होता. त्यानं सांगितलं होतं की, त्याला कोरोना झालाय. आता कोरोनामुळे त्या महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, लंडनमधील व्हिक्टोरिया स्टेशनवर बेली मुजिंगा काम करत होती. मार्च महिन्यात ती आणि तिच्या एका महिला सहकाऱ्यावर पॅसेंजर थुंकला होता. त्यानंतर प्रवाशाने असंही म्हटलं होतं की, त्याला कोरोना झाला आहे. त्यानंतर काही दिवसांनी दोन्ही महिला आजारी पडल्या.
दोघींपैकी बेली मुजिंगा हिची तब्येत खूपच खालावली. तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानं व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं. मात्र ती ठीक झाली नाही. अखेर 5 एप्रिलला त्यांचा मृत्यू झाला. अंत्यसंस्कारावेळी फक्त दहाच लोक हजर होते. बेली यांच्या 11 वर्षीय मुलीने सांगितलं की, आईसोबत शेवटचं बोलणं व्हिडिओ कॉलवर केलं होतं. त्यानंतर आईला बर्नेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर बेली यांना त्यांच्या ऑफिसमध्ये काम कऱण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. जेव्हा तुम्ही घरच्या, तुमच्या आवडत्या व्यक्तीला इतक्या लवकर गमावता हे खूप धक्कादायक असतं असं बेलीचे पती लुसांबा यांनी सांगितलं.
हे वाचा : Covid-19 : मंत्री शिंकल्याने अख्ख्या राज्यात घबराट, जनतेकडून केली जातेय विचारपूस
बेली यांचा पती म्हणाला की, कोरोना त्या प्रवाशाने थुंकल्यामुळे झाला. तो सहज थांबवता आला असता. प्रवासी दोन्ही महिलांवर ओरडला होता. तुम्ही इथं काय करताय म्हणत त्यांच्यावर पुन्हा पुन्हा थुंकत होता. तेव्हा बेली खूप घाबरली होती.
हे वाचा : एका हातात मुलाला पकडून ट्रकवर चढतोय मजूर, व्हायरल होणाऱ्या फोटोमागची कहाणी
ब्रिटनमध्ये असे अनेक प्रकार समोर आले आहेत. ज्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांवर जाणीवपूर्वंक कोरोनाग्रस्तांकडून थुंकने, शिंकण्याचे प्रकार केले जात आहेत. बेली मुजिंगा बाबत झालेल्या प्रकारानंतर याची चौकशी केली जाईल असंही सांगण्यात आलं आहे. तसंच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाईल.
हे वाचा : 113 वर्षांच्या आजीने कोरोनाला हरवलं; व्हायरसमुक्त होणारी सर्वात वयस्कर रुग्ण
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus