नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर: अमेझॉनवर कारवाई (CAIT holds protest in 500 districts to demand action against Amazon) करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी देशातील व्यापारी संघटनेनं आंदोलन पुकारलं आहे. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या संघटनेनं रस्त्यावर येत अमेझॉनवर कडक (Demand to take action against Amazon) कारवाई करण्याची मागणी केली आहे. ऑनलाईन अंमली पदार्थांची विक्री करणं आणि देशविघातक कारवायांसाठी वस्तूंचा पुरवठा करणं या प्रमुख कारणांसाठी अमेझॉनव कारवाई करण्याची मागणी या संघटनेनं केली आहे. तर कापड आणि चपला (Hike in GST on textile and footware) यांच्यावरील जीएसटी वाढल्याचाही या संघटनेनं निषेध केला आहे.
Traders @CAITIndia have staged a nationwide protest today against recent news of continued unethical malpractices by #Amazon of sellings drugs,selling chemicals used for bombs in Pulwama and selling poison. The protest in New Delhi was led by Shri @praveendel & Shri @AhujaVipen. pic.twitter.com/gOkAxJ2i4y
— Confederation of All India Traders (CAIT) (@CAITIndia) November 24, 2021
यवतमाळमध्येही कॅट संघटनेच्या वतीनं अमेझॉनविरोधात आंदोलन करण्यात आलं.
काय आहे प्रकरण? अमेझॉननं काही दिवसांपूर्वी मारिज्युआना म्हणजेच चरसचा ऑनलाईन पुरवठा केल्याची माहिती समोर आली होती. भारतात ड्रग्जच्या व्यापाऱ्याला बंदी असताना अमेझॉननं सर्व नियम धाब्यावर बसवत गांजाचा पुरवठा केल्याचं समोर आलं होतं. तर त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे पुलवामा हल्ल्यासाठीची रसायनं अमेझॉनवरून डिलिव्हर करण्यात आल्याचंही राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या तपासातून समोर आलं होतं. दहशतवाद्यांनी पुलवामा येथे हल्ला करण्यासाठी जी स्फोटकं तयार केली, त्यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या रसायनांची मागणी दहशतवाद्यांनी अमेझॉनवर नोंदवली होती आणि ती पूर्ण करण्यात आली होती. या दोन्ही गंभीर प्रकरणांत अमेझॉनवर कडक कारवाई करण्यात यावी, यासाठी या संघटनेनं रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला असून देशातील विविध राज्यांतील 500 जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन करण्यात आलं आहे. जीएसटी वाढीविरोधातही एल्गार केंद्र सरकारच्या जीएसटी काउन्सिलनं टेक्सटाईल आणि चपला यावरील जीएसटी वाढवण्याचा निर्णय़ घेतला आहे. लॉकडाऊनच्या काळात हे दोन्ही उद्योग डबघाईला आले असून त्यांना पुन्हा उभारी मिळण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत या उद्योगांना प्रोत्साहन आणि सवलत देण्याऐवजी या वस्तूंवरील कर वाढवण्यात आल्याचा संघटनांकडून निषेध नोंदवण्यात आला. हे वाचा - आमदार बाबाजानी दुर्रानी यांचा राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा अमेझॉन अनैतिक मार्गांचा वापर करून आपला व्यवसाय वाढवण्याचा आणि नफा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा छोट्या व्यापाऱ्यांना फटका बसत असून नैतिक मूल्यांचंदेखील अधःपतन होत असल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी केली आहे.