बीजिंग, 01 मार्च : प्रत्येकाचं स्वप्नं असतं आपल्याकडे Apple iPhone असावा. कित्येक जण यासाठी पैसे जमवतात. एकेएक करून पैसा जमवून अखेर तुम्हीदेखील असाच आयफोन खरेदी असेल. फोनची ऑनलाईन ऑर्डर दिली असेल आणि आता तो फोन आपल्या हातात कधी पडणार याची प्रतीक्षा करत असाल, अगदी उत्सुकतेने तुम्ही एक एक मिनिट मोजत असता, डिलीव्हीरी बॉयची वाट पाहता असता. अखेर तो क्षण आला. आयफोन घेऊन डिलीव्हरी बॉय तुमच्या दारातही आला. तुम्ही मोठ्या उत्साहात त्याच्या हातातील ते पार्सल आपल्या हातात घेतलं आणि सर्वात आधी ते पार्सल उघडलं आणि हे काय अॅपल आयफोन नाही तर अॅपल ज्युसचा (apple juice) बॉक्स. काय ही सर्व कल्पना करूनच तुम्हाला मोठा धक्का बसला ना.
चीनमधील (china) एका महिलेला प्रत्यक्षात हा धक्का बसला. आतापर्यंत तुम्ही जे वाचत होता ते चीनमधील एका महिलेच्या बाबतीच प्रत्यक्षात घडलं आहे. तिनं अॅपल आयफोन मागवला आणि त्याबदल्यात तिला अॅपल ज्युस मिळाला आहे.
हे वाचा - गे असणाऱ्या भावाला पिता बनवण्यासाठी बहिणीनेच केली मदत, स्वतः दिला बाळाला जन्म
या महिलेनं स्वतःसाठी आयफोनची ऑनलाइन ऑर्डर दिली होती. अॅपल आयफोन 12 प्रो मॅक्स तिनं ऑर्डर केला होता. पण तिला बॉक्समध्ये अॅपलचं योगर्ड फ्लेव्हर्ड ड्रिंक मिळालं. जे पाहून तिला मोठा धक्काच बसला.
आज तकनं ग्लोबल टाइम्सच्या रिपोर्टचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार, महिलेनं आयफोन 12 प्रो मॅक्स खरेदी करण्यासाठी 1500 डॉलर्स म्हणजे तब्बल एक लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे खर्च केले होते. तिनं अॅपलच्या वेबसाईटवरून हा फोन खरेदी केला होता.
हे वाचा - देशाच्या या भागात लग्नाआधी लिव्ह इनमध्ये राहातात कपल, 105 जणांनी बांधली लग्नगाठ
महिलेनं अॅपलच्या अधिकृत वेबसाईटवरून फोन खरेदी केला होता. मेल सर्व्हिस कंपनीनंही महिलेनं जे लोकेशन दिलं होतं. फोन तिथंच डिलीव्हर करण्यात आल्याचं सांगितलं. मग ती या फ्रॉडची शिकार नेमकी कशी झाली माहिती नाही. याबाबत तिनं पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अॅपल कंपनी आणि स्थानिक कुरिअर कंपनीदेखील याबाबत तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.