जाहिरात
मराठी बातम्या / लव स्टोरी / Live-in Relationship मध्ये राहाणारी 105 जोडपी अडकली विवाहबंधनात, लग्नासाठी का करावा लागतो इतका संघर्ष?

Live-in Relationship मध्ये राहाणारी 105 जोडपी अडकली विवाहबंधनात, लग्नासाठी का करावा लागतो इतका संघर्ष?

Live-in Relationship मध्ये राहाणारी 105 जोडपी अडकली विवाहबंधनात, लग्नासाठी का करावा लागतो इतका संघर्ष?

इथल्या लोकांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. यामुळे या लोकांवर लिव्ह इनमध्ये राहण्याची वेळ येते. सामाजिक कार्यक्रमांत भाग घेण्याचा त्यांचा अधिकारही काढून घेतला जातो.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 01 मार्च : झारखंडच्या खूंटीमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live-in Relationship) राहाणाऱ्या 105 जोडप्यांनी लग्नगाठ बांधली आहे. गरीबीमुळे हे लोक लग्न करू शकत नाहीत. लग्न करणं आणि गावातील लोकांना भोजन देण्यासाठी असमर्थ असल्यानं ते लोक लिव्ह इनमध्येच राहातात. समाजात या लोकांना ढुकू या नावानं संबोधलं जातं. मात्र, आता या जोडप्यांना सामाजिक स्तरावर न्याय मिळाला आहे. राज्यपाल द्रोपदी मुर्मू आणि केंद्रीय सचिन एन एन सिन्हा यांनी या जोडप्यांना आशिर्वाद दिले. या जोडप्यांना सामाजिक मान्यता देण्यासाठी एका संस्थेनं जबाबदारी घेतली. त्यांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहाणाऱ्या 105 जोडप्यांना लग्नाच्या नात्यात बांधण्यास मदत केली आणि अखेर या जोडप्यांना ढुकू या नावापासून मुक्ती मिळाली. 2017 पासून सलग 5 वर्ष या लोकांना समजावल्यानंतर निमित संस्थेचं हे काम पूर्ण झालं. याठिकाणी अतिशय मागास वर्गातील लोक लग्न समारंभ करून लोकांना भोजन देऊ शकत नाहीत. इथल्या लोकांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. यामुळे या लोकांवर लिव्ह इनमध्ये राहण्याची वेळ येते. सामाजिक कार्यक्रमांत भाग घेण्याचा त्यांचा अधिकारही काढून घेतला जातो. तसेच या लोकांना नेहमीच टोमणे ऐकावे लागतात. अनेकदा या जोड्या लग्न करतात मात्र जेव्हा ही जोडपी लोकांना भोजन देण्यास असमर्थ ठरतात तेव्हा त्यांना लिव्ह इनमध्ये राहाण्याशिवाय पर्याय नसतो. या गोष्टीचा सामना फक्त या जोडप्याला नाही तर त्यांच्या पुढील पिढ्यांनाही करावा लागतो. सरकारी स्तरावरही त्यांना विधवा पेन्शन, आधार कार्ड,राशन कार्ड बनवण्यास अनेक अडचणी निर्माण होतात. याच कारणामुळे संस्थने सतत या लोकांसोबत संपर्कात राहात त्यांच्या सामूहिक विवाहसोहळ्याचं आयोजन केलं. या कार्यक्रमाला राज्यपाल द्रोपदी मुर्मू यांनी मुख्य अतिथी म्हणून हजेरी लावत व्हर्चुअल पद्धतीनं वधू- वरांना आशिर्वाद दिले. तसेच सरकारी योजनांचा लाभ देण्याचं आश्वासनही दिलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात