जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / गे असणाऱ्या भावाला पिता बनवण्यासाठी बहिणीनेच केली मदत, स्वतः दिला बाळाला जन्म

गे असणाऱ्या भावाला पिता बनवण्यासाठी बहिणीनेच केली मदत, स्वतः दिला बाळाला जन्म

गे असणाऱ्या भावाला पिता बनवण्यासाठी बहिणीनेच केली मदत, स्वतः दिला बाळाला जन्म

42 वर्षांची ट्रेसी हल्सने आपल्या भावाला बाबा होण्यासाठी मदत केली. ट्रेसीने तिचा 38 वर्षीय भाऊ अँथनी डीगन आणि त्याचा 30 वर्षांचा पार्टनर रे विल्यम्स यांना मदत केली. तिने या दोघांसाठी सरोगसीद्वारे बाळाला जन्म दिला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    ब्रिटन, 1 मार्च : बहीण-भावाचं नातं जगातलं सर्वात प्रेमळ आणि अतुट नातं मानलं जातं. कितीही भाडणं, मस्करी, वाद झाले तरी ते एकमेकांच्या मदतीसाठी धावून येतात. याचीच प्रचिती एका घटनेतून आली आहे. आपल्या गे (Gay) भावाला पिता बनवण्यासाठी त्याच्या बहिणीने चक्क आई होण्याचा निर्णय घेतला. भावासाठी या बहिणीने सरोगरीद्वारे (surrogate) बाळाला जन्म दिला आहे. ब्रिटनमधील मँचेस्टर (Manchester) शहरातील ही घटना आहे. 42 वर्षांची ट्रेसी हल्सने आपल्या भावाला बाबा होण्यासाठी मदत केली. ट्रेसीने तिचा 38 वर्षीय भाऊ अँथनी डीगन आणि त्याचा 30 वर्षांचा पार्टनर रे विल्यम्स यांना मदत केली. तिने या दोघांसाठी सरोगसीद्वारे बाळाला जन्म दिला आहे. मागच्या वर्षी 12 ऑक्टोबरला अँथनी डीगन (Anthony Deegan) आणि रे विल्यम्स (Ray Williams) यांनी आपला मुलगा थियोचं या जगात स्वागत केलं. या जोडप्यानं दोन अज्ञात स्री बीज देणगीदारांच्या मदतीने आयव्हीएफच्या माध्यमतून (IVF) पितृत्व प्राप्त केलं. आयव्हीएफच्या तीन राऊंडसाठी 36,000 डॉलर्सचं कर्ज घेतलं होते. दोघांनी स्पर्म दान केले होते. डेली मेलशी बोलताना अँथोनीने सांगितलं की, तो आणि ट्रेसी भाऊबहीण असले तरीही त्यांची घनिष्ठ मैत्रीही आहे. ट्रेसीच्या लग्नाच्या दिवशी या सोहळ्यामध्ये तिचे वडील उपस्थित राहू शकले नव्हते त्यावेळी मी तिला घेऊन आलो होतो. अँथनीकडे सबवेची फ्रँचायझी (Subway franchise) आहे आणि ट्रेसी एरिया मॅनेजर आहे.

    (वाचा -  असली कसली शेवटची इच्छा, मुलांनी वडिलांच्या अस्थी बारमधील गटारात केल्या विसर्जित )

    ट्रेसी म्हणाली, ‘सरोगेट शोधण्यासाठी हे जोडपं खूप प्रयत्न करत होतं. एका वर्षाच्या प्रयत्नांनंतर या जोडप्यानं आशा सोडून दिली होती त्यामुळे मी त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला.’ तिने पुढं सांगितलं की, ‘मी या पूर्वी दोनदा या जोडप्याला सरोगसीची ऑफर केली होती पण त्या वेळी सगळ्यांनी हा विषय मस्करीमध्ये नेला. पण तिसऱ्यांदा मी गांभीर्याने हा विषय बोलत आहे हे कळाल्यावर मात्र हे दोघं मला सरोगेट मदर म्हणून स्वीकारायला तयार झाले.’ ट्रेसीच्या नवऱ्याने तिला सांगितलं होतं की तुझं वय बाळंतपणाच्या दृष्टिने जास्त आहे. पण ट्रेसी म्हणाली, ‘ माझ्या भावाने सरोगसीसाठी माझ्यावर विश्वास दाखवला याचाच मला अभिमान वाटत होता, त्यामुळे मी तयार झाले.’ अँथनीला खात्री होती की, त्याचं बाळ योग्य हातांमध्ये आहे कारण ट्रेसीला स्वत:ची सहा मुलं आहेत.’

    (वाचा -  अजब! तीन वर्षं गर्भवती राहिल्यानंतर महिलेनं दिला बकरीला जन्म, काय आहे प्रकरण? )

    त्याने पुढं सांगितलं की, ‘ट्रेसीनं त्याला आयुष्यातील सर्वात मोठं गिफ्ट दिलं आहे आणि त्यांचं नातं आता पूर्वीपेक्षा खूपच घट्ट झालं आहे.’ अँथोनीने यासाठी ट्रेसीला पैसे दिले नाहीत. तो म्हणतो की, ‘तिनं आमच्यासाठी जे काही केलं त्याची तुलना पैशात केली जाऊ शकत नाही.’ त्या आधी, अँथनी डीगन आणि रे विल्यम्स हे दोघे सरोगसी यूकेद्वारे आयोजित सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सरोगेट शोधण्याचा प्रयत्न करत होते. पण एका वर्षांच्या प्रयत्नांना यश न आल्याने त्यानी आशा सोडून दिली होती. या जोडप्यानं मँचेस्टर बेस्ड केअर फर्टिलिटीमध्ये आयव्हीएफची प्रक्रिया सुरू केली. त्या ठिकाणी त्यांनी दोघांचं स्पर्म दान केलं आणि दोन स्वतंत्र बॅचेस तयार केल्या. आयव्हीएफचे दोन राऊंड अपयशी ठरले. पण तिसऱ्या राऊंडमध्ये त्यांना यश आलं. बाळ थिओचं डोकं अडकल्यामुळे ट्रेसीवर सी सेक्शन शस्त्रक्रिया करण्यात आली आणि बाळाचा जन्म झाला. ती म्हणाली, ‘मला झालेल्या त्रासापेक्षा माझा भाऊ आणि त्याच्या पार्टनर वडील झाल्याचे मला अधिक समाधान आहे.’

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात