मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

TV शोमध्ये दिली सावत्र भावावरील प्रेमाची कबुली, आता दोघं करतायंत एकमेकांना डेट

TV शोमध्ये दिली सावत्र भावावरील प्रेमाची कबुली, आता दोघं करतायंत एकमेकांना डेट

वर्षानुवर्षे आपल्या भावना लपवून ठेवल्यानंतर एका तरुणीनं आपल्या सावत्र भावावर असणाऱ्या तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे. आता त्या दोघांनीही डेटिंग सुरू केलं आहे (फोटो सौजन्य-ITV)

वर्षानुवर्षे आपल्या भावना लपवून ठेवल्यानंतर एका तरुणीनं आपल्या सावत्र भावावर असणाऱ्या तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे. आता त्या दोघांनीही डेटिंग सुरू केलं आहे (फोटो सौजन्य-ITV)

वर्षानुवर्षे आपल्या भावना लपवून ठेवल्यानंतर एका तरुणीनं आपल्या सावत्र भावावर असणाऱ्या तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे. आता त्या दोघांनीही डेटिंग सुरू केलं आहे (फोटो सौजन्य-ITV)

वर्षानुवर्षे आपल्या भावना लपवून ठेवल्यानंतर एका तरुणीनं आपल्या सावत्र भावावर असणाऱ्या तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे. आता त्या दोघांनीही डेटिंग सुरू केलं असून, आपल्या नात्याला पुढं नेण्यासाठी दोघंही उत्सुक आहेत. त्यांच्या पालकांची त्यांच्या या नात्याबद्दलची प्रतिक्रियाही महत्त्वाची ठरणार आहे; पण सध्या हे दोघं कोणत्याही अडथळ्यावर मात करून आपल नातं पुढं नेण्यासाठी सज्ज असल्याचं दिसत आहे.

‘सिक्रेट क्रश’ (Secret Crush) नावाच्या एका डेटिंग शोमध्ये (Dating Show) हे अजब प्रेमप्रकरण उघड झालं आहे. या शोमध्ये सहभागी झालेले लोकं डेटवर (Date) जाण्यापूर्वी आपल्या प्रेमाची कबुली देतात. या शोमध्ये सहभागी झालेल्या मॅडी (Maddie) नावाच्या तरुणीनं आपल्या कॅलम(Callum) या सावत्र भावावर लहानपणापासून प्रेम करत असल्याचं सांगितलं. या शो दरम्यान ते दोघं भेटले. टाइम्स नाऊने याबाबत वृत्त दिले आहे

तिची आई आणि कॅलमचे वडील काही वर्षांपूर्वी रिलेशनशीपमध्ये होते. तेव्हा कॅलमचा जन्म झाला होता. नंतर मॅडीच्या आईनं मॅडीच्या वडिलांशी लग् नकेलं. त्यामुळं कॅलमला ती लहानपणापासून ओळखते. तेव्हापासूनच तिला तो आवडतो; पण कालांतरानं ते दूर गेले त्यांचा संपर्क उरला नाही, असं यावेळी मॅडीनं सांगितलं. मात्र ती नेहमीच त्याच्यावर प्रेम करत राहिली. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून ते पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले आणि पुन्हा तिच्या भावनांनी उचल खाल्ली आणि अखेर मॅडीनं या शोमध्ये सहभागी झाल्यानंतर जाहीरपणे आपलं प्रेम व्यक्त केलं.

हे वाचा-ही कंपनी केवळ टोस्टर विकते 25000 रुपयांना, विचार करा 5G फोनची किंमत किती असेल

‘मी येथे माझ्या सावत्र भावाला (Step Brother) हेच सांगण्यासाठी आले आहे की तो मला आवडतो. आमचं काहीही नातं नाही. कॅलम हा जवळपास नऊ वर्षांपूर्वीचा माझ्या आईच्या प्रियकराचा मुलगा आहे. म्हणून तो माझा एक सावत्र भाऊ आहे. बालपणानंतर आता काही वर्षांनंतर सोशल मीडियावर आम्ही पुन्हा संपर्कात आलो. आता तो खूपच प्रगल्भ झाला आहे आणि खूप छान दिसतो,’ असं तिनं या कार्यक्रमात सांगितलं.

मॅडी आपल्या आईबरोबरच राहते. आपल्या या कबुलीनंतर कॅलमची काय प्रतिक्रिया असेल याबाबत ती थोडी चिंताग्रस्त आणि थोडी रोमांचित होती. मॅडीला आपल्याबद्दल काय वाटतं हे कळल्यानंतर कॅलम एकदम आश्चर्यचकित झाला.त्याचा विश्वासच बसत नव्हता. ‘अनेक वर्षात मी तुला पाहिलेलं नाही आणि आपण खूप वेळा बोललोही नाही. तू हे गुपितच ठेवलंस. आज हे कळल्यानंतर मी अक्षरशः थरारून गेलो आहे', अशा शब्दात त्यानं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ती शेवटची त्याला भेटली होती त्यानंतर आता तो अधिक प्रगल्भ झाला असल्याची प्रतिक्रिया मॅडीनं दिली.

हे वाचा-कोरोनाबरोबरच ट्रेंडमध्येही होतोय बदल; सध्या सोफा खरेदीकडे कल, काय आहे कारण?

त्यांच्या नात्याच्या कायदेशीर वैधतेबद्दल बोलताना मॅडी म्हणाली की, ‘आम्ही आमचं नातं लपवणार नाही आहोत. त्यामुळं आम्ही कायदा मोडत आहोत, असं आम्हाला वाटत नाही. तर 'माझ्या आई-वडिलांनी लग्न केलं नव्हतं त्यामुळे आम्ही तसं म्हटलं तर आम्ही सावत्र बहीण-भाऊ नाही आहोत,; असं उत्तर कॅलमनं दिलं.

त्यांच्या नात्यावर त्याचे वडील काय प्रतिक्रिया देतील, असं विचारलं असता कॅलम म्हणाला की, त्यांना शब्दच सुचणार नाहीत असं मला वाटतं. त्यांची काय प्रतिक्रिया असेल हे मी सांगू शकत नाही पण मला आता त्याबद्दल काळजी नाही. कारण हे माझ्याबद्दल आहे त्यांच्याबद्दल नाही.’

First published:

Tags: Dating app, Social media