जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / कोरोनाबरोबरच ट्रेंडमध्येही होतोय बदल; सध्या सोफा खरेदीकडे कल, कारण वाचून थक्क व्हाल!

कोरोनाबरोबरच ट्रेंडमध्येही होतोय बदल; सध्या सोफा खरेदीकडे कल, कारण वाचून थक्क व्हाल!

आठवड्यातून एकदा सोफा कव्हर,पडदे,बेडशीट,उशांचे कव्हर स्वच्छ करा.

आठवड्यातून एकदा सोफा कव्हर,पडदे,बेडशीट,उशांचे कव्हर स्वच्छ करा.

सध्या सोफा खरेदी करण्याकडे कल वाढत असल्याचे दिसून येत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 14 मे : कोरोनामुळे घरातून काम करणाऱ्यांची संख्या वाढली. अनेक जण गेल्या वर्षभरापासून घरून काम करत आहेत. बाहेर पडण्यास परवानगी नसल्यानं त्यांचा सगळा वेळ घरात जातोय. त्यामुळे होम डेकोर(home décor)म्हणजे घर सजावटीकडे या लोकांचा कल वाढलाय. विशेषतः आरामदायक सोफा(comfortable sofa)खरेदी करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. याचा फायदा फर्निचर बनवणाऱ्या कंपन्यांना होत असून त्यांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. गोदरेज इंटेरियोचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट सुबोध मेहतांनी एनबीटी सोबत याबाबत चर्चा केली. ते म्हणाले,घरीच असल्यामुळे लोक घरातील सामान,सजावट आणि इतर गोष्टींवर बारकाईने लक्ष देत आहे. किचन (kitchen)चांगले आणि मॉडीफाय करण्यासाठी ते चांगल्या पर्यायांची चाचपणी करत आहे. तसेच आरामदायक सोफा शोधत आहेत. लॉकडाऊन आणि वर्क फ्रॉम होममुळे(work from home)फर्निचर विक्रीत 2 ते 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच गेल्यावर्षी वर्क फ्रॉम होमसाठी लागणाऱ्या प्रोडक्ट्समध्ये 5 ते 10 टक्क्यांची वाढ झाली होती. हे ही वाचा- प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम नसतं; तो असतो Hormones चा झोल! पुरुष जास्त वेळ घरी असल्यानं फर्निचर(furniture)खरेदी – इंडस्ट्रीतील जाणकारांनी सांगितल्याप्रमाणे,घरात होणाऱ्या बदलांचं मुख्य कारण पुरुषांचं जास्त वेळ घरात असणं आहे. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सराफ फर्निचरचे फाऊंडर आणि सीईओ रघुनंदन म्हणाले,की वर्क फ्रॉम होममुळे पुरुष घरातच आहे. त्यामुळे घरात लागणाऱ्या सामानाच्या खरेदीत त्यांची आवड निर्माण झाली आहे. या महामारीच्या काळात सर्व उद्योगधंदे बंद पडले असताना त्यांच्या कंपनीच्या विक्रीत मात्र 300 टक्क्यांनी तेजी आली आहे,असंही ते म्हणाले. पहिल्या लॉकडाऊनमध्ये अर्गोनॉमिक्स चेअर आणि डेस्कची मागणी – गेल्या वर्षी अर्गोनॉमिक्स चेअर आणि डेस्कची(ergonomic chairs and desks)सर्वाधिक मागणी होती. मध्यंतरी कोरोनाची लाट ओसरल्यानंतर ऑफीस सुरू झाले होते. मात्र,आता कोरोनाची दुसरी लाट आली असल्याने वर्क फ्रॉम होमचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे लोक पुन्हा घरी आहेत. देशातील सर्वात मोठ्या ऑनलाइन फर्निचर कंपन्यांपैकी एका कंपनीचे सिनीयर एक्झिक्यूटीव्ह म्हणाले,की गेल्या वर्षभरात सोफा(sofa),बीन बॅग्स(bean bag chair),स्टोरेज सोल्यूशन्स(storage solutions),होम डेकोर(Home decor),लॅम्प आणि कारपेटची(lamp and carpet)मागणी सर्वाधिक वाढली आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात