मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

पेट्रोल पंपावरील टॉयलेटमध्ये गेलेल्या महिलेसोबत घडलं अनपेक्षित; पाहून अवाक झाला पती

पेट्रोल पंपावरील टॉयलेटमध्ये गेलेल्या महिलेसोबत घडलं अनपेक्षित; पाहून अवाक झाला पती

केटलिन आपल्या नवजात बाळाला घेऊन बाहेर आल्यानंतर हा प्रकार समोर आला. टॉयलेटमध्ये आलेल्या एका महिलेच्या मदतीनं केटलिननं सिर्जिओला तो पिता झाल्याचा निरोप दिला

केटलिन आपल्या नवजात बाळाला घेऊन बाहेर आल्यानंतर हा प्रकार समोर आला. टॉयलेटमध्ये आलेल्या एका महिलेच्या मदतीनं केटलिननं सिर्जिओला तो पिता झाल्याचा निरोप दिला

केटलिन आपल्या नवजात बाळाला घेऊन बाहेर आल्यानंतर हा प्रकार समोर आला. टॉयलेटमध्ये आलेल्या एका महिलेच्या मदतीनं केटलिननं सिर्जिओला तो पिता झाल्याचा निरोप दिला

नवी दिल्ली 18 ऑक्टोबर : प्रवास करताना आपण अनेकदा वाहनामध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरून घेण्यासाठी पेट्रोल पंपावर थांबतो. गरज पडल्यास पेट्रोल पंपांवर (petrol pump) असलेल्या टॉयलेट्सचा (toilet) वापर देखील करतो. लांब पल्ल्याच्या प्रवासामध्ये तर पेट्रोल पंपावरील हे टॉयलेट्स अतिशय उपयुक्त ठरतात. मात्र, हेच टॉयलेट एका महिलेसाठी लेबर रूम (Labor room) ठरलं आहे! अमेरिकेतील टेक्सास प्रांतातील एका महिलेनं पेट्रोल पंपावरील टॉयलेटमध्ये आपल्या बाळाला जन्म (Baby Birth) दिला. केटलिन फुलर्टन असं या महिलेच नाव असून तिची आणि बाळाची तब्येत एकदम ठिक आहे.

जुलै महिन्यामध्ये गर्भवती असलेली केटलिन फुलर्टन, पती सर्जिओसोबत आपल्या गाडीतून प्रवास करत होती. ती जरी गर्भवती असली तरी तिच्या डिलीवरीची वेळ जवळ आलेली नव्हती. प्रवासादरम्यान तिला आपल्याला लघवी लागल्याची जाणीव झाली. म्हणून तिनं सर्जिओला एका पेट्रोलपंपावर गाडी थांबवण्यास सांगितलं. त्यानं बीस्लीमधील एका पेट्रोल पंपावर गाडी उभी केली. गाडीतून उतरुन टॉयलेटपर्यंत जाताना केटलिन एकदम ठीक होती. ती स्वत: चालत टॉयलेटमध्ये गेली. मात्र, आतमध्ये गेल्यानंतर तिला प्रसूती कळा (Contractions) सुरू झाल्या. त्यानंतर पुढील 10 मिनिटांतच तिनं एका मुलाला जन्म (Birth) दिला, असं वृत्त लॅडबायबलमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे.

युवकाच्या गळ्याभोवती कोब्र्यानं घातला विळखा अन्...; थराकाप उडवणारा VIDEO

या प्रकाराची माहिती समोर आल्यानंतर एबीसी न्यूजनं केटलिन फुलर्टन आणि तिचा पती सर्जिओची एक मुलाखत देखील घेतली. त्यात केटलिननं आपला अनुभव सांगितला. 'आम्ही प्रवास करत असताना मला पोटावर दाब पडत असल्याचं वाटत होतं. माझ्या डिलिवरीला वेळ होता. त्यामुळं कदाचित लघवीला आली असेल, असं मला वाटलं. मात्र, जेव्हा मी पेट्रोल पंपावरील टॉयलेटमध्ये गेले तेव्हा अचानक वेदना सुरू झाल्या. माझ्या मदतीला देखील कुणीच नव्हतं. मी स्वत:च माझी डिलिवरी पार पाडली,' असं केटलिननं सांगितलं.

केटलिन आपल्या नवजात बाळाला घेऊन बाहेर आल्यानंतर हा प्रकार समोर आला. टॉयलेटमध्ये आलेल्या एका महिलेच्या मदतीनं केटलिननं सिर्जिओला तो पिता झाल्याचा निरोप दिला. त्यानंतर पॅरामेडिक्सच्या मदतीनं केटलिन आणि तिच्या बाळाला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथे दोघांची वैद्यकिय तपासणी करण्यात आली. केटलिनच्या बाळाचं वजन ७ पाउंड भरलं होतं. केटलिननं आपल्या बाळाचं नाव केलिहॅन ठेवलं असून ती टिकटॉकवर (TikTok) त्याच्या अपडेट्स शेअर करत असते.

सार्वजनिक शौचालयात गेलेली पत्नी; बाहेर येताच ते दृश्य पाहून पतीला बसला धक्का

गेल्या वर्षी युनायडेट किंग्डमच्या ससेक्स प्रांतात देखील एका महिलेची अनपेक्षितपणे डिलीवरी झाली होती. तिला तर ती गर्भवती असल्याचं माहिती देखील नव्हतं. ग्रेस मेशिम नाव असलेली ही महिला ३७ आठवड्यांची गर्भवती होती. विशेष म्हणजे तिची मासिक पाळी देखील नियमित सुरू होती आणि तिच्या पोटाचा घेर देखील सामान्य होता.

केटलिन फुलर्टनसारखी अनपेक्षित परिस्थिती कुणावरही येऊ शकते. त्यामुळं गर्भवती महिलांनी प्रवासात आपली विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

First published:

Tags: Pregnant woman, Viral news