मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

अजब आजार! अन्नपाण्याऐवजी ही महिला खाते चुना, शेजाऱ्यांच्या भिंतीही करते फस्त

अजब आजार! अन्नपाण्याऐवजी ही महिला खाते चुना, शेजाऱ्यांच्या भिंतीही करते फस्त

एका महिलेचं भिंत खाण्याचं (Woman eats wall strange psychological addiction) व्यसन सुटता सुटत नाहीय. काही वर्षांपूर्वी तिला खडू खाण्याची सवय लागली होती.

  • Published by:  desk news

मिशिगन, 27 ऑक्टोबर: एका महिलेचं भिंत खाण्याचं (Woman eats wall strange psychological addiction) व्यसन सुटता सुटत नाहीय. काही वर्षांपूर्वी तिला खडू खाण्याची सवय लागली होती. हळूहळू तिचं खडू (Addiction began with eating chocks) खाण्याचं प्रमाण वाढत गेलं. त्यानंतर तिला भिंतीचा वास आणि चव आवडू लागली. भिंतीचा स्पर्शही तिच्या जिभेला हवाहवासा वाटू लागला. मग तिने भिंतीवर आडवा हात मारायला सुरुवात केली.

अशी लागली सवय

अमेरिकेतील मिशिगनमध्ये राहणाऱ्या निकोलची आई पाच वर्षांपूर्वी वारली. तिला या घटनेचा जबर धक्का बसला आणि ती अतीव दुःखी झाली. या काळातच ती अनावधानाने घरात असणाऱ्या खडूंशी खेळू लागली. हळूहळू ते खडू जिभेला लावून त्यांची चव घेता घेता खडू खाऊन टाकण्याची सवय तिला लागली. काही महिन्यांत तर ती खडूचे बॉक्सच्या बॉक्स फस्त करत असे. या सवयीपासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी तिने घरात खडू आणणंच बंद केलं.

खडूऐवजी भिंतीवर ताव

खडू आणणं बंद केलं तरी तिला चुन्याचा नाद स्वस्थ बसू देईना. ती आपल्या घरातील भिंतीपाशी जाऊ लागली आणि भिंत चाटू लागली. भिंतीचा वास आणि त्याचा जिभेला होणारा स्पर्श या दोन्ही गोष्टी तिला हव्याहव्याशा वाटू लागल्या. ती दररोज भिंत उकरून खाते. तिच्या या सवयीचा तिला स्वतःलाही प्रचंड त्रास होतो. मात्र तिला भिंतीतील माती आणि चुन्याचं असं काही व्यसन जडलं आहे की ते सुटता सुटत नाही.

हे वाचा- मुलांच्या श्वासाला दुर्गंधी येतेय? वाचा, तज्ज्ञांनी सांगितलेली कारणं आणि उपाय

दिवसातून सहा वेळा खाते भिंत

निकोलस दिवसातून सहा वेळ भिंत खाते. ज्यावेळी ती स्वतःच्या घरी नसते तेव्हा जिथं असेल तिथल्या भिंती पोखरून त्या खात बसते. हा एक प्रकारचा मानसिक आजार असला तरी सर्वसामान्य माणसं मात्र त्यामुळे वैतागतात. अनेकांनी खर्च करून सजवलेल्या भिंतींचं निकोलस नुकसान करत असल्यामुळे तिला आपल्या घरी बोलवायलाही अनेकजण अनुत्सुक असतात. निकोलसने ही सवय वेळेत सोडली नाही, तर तिच्यासाठी हे जीवघेणं ठरू शकतं, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

First published:

Tags: America, Health