मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

मुलांच्या श्वासाला दुर्गंधी येतेय? वाचा, तज्ज्ञांनी सांगितलेली कारणं आणि उपाय

मुलांच्या श्वासाला दुर्गंधी येतेय? वाचा, तज्ज्ञांनी सांगितलेली कारणं आणि उपाय

लहान मुलांच्या तोंडाला येणारी (Bad breathing in kids reasons and solutions) दुर्गंधी ही चिंतेची बाब असून त्यावर वेळीच उपाय करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

लहान मुलांच्या तोंडाला येणारी (Bad breathing in kids reasons and solutions) दुर्गंधी ही चिंतेची बाब असून त्यावर वेळीच उपाय करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

लहान मुलांच्या तोंडाला येणारी (Bad breathing in kids reasons and solutions) दुर्गंधी ही चिंतेची बाब असून त्यावर वेळीच उपाय करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

  • Published by:  desk news

नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर : लहान मुलांच्या तोंडाला येणारी (Bad breathing in kids reasons and solutions) दुर्गंधी ही चिंतेची बाब असून त्यावर वेळीच उपाय करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. झोपेतून उठल्यावर (Bad breathing in the morning) प्रत्येकाच्या तोंडाला वास येत असतो. रात्रभर जमा झालेल्या बॅक्टेरियांचा तो परिणाम (Effect of bacteria) असल्याचं सांगितलं जातं. सकाळी उठल्यावर चूळ भरल्यानंतर किंवा ब्रश केल्यानंतर हा वास निघून जातो. मात्र काहीजणांमध्ये मात्र ब्रश करूनही हा वास जात नाही. दिवसभर त्यांच्या श्वासातून दुर्गंधी येत राहते. यामागे काही वैद्यकीय कारणं असल्याचं सांगितलं जातं.

दुर्गंधीमागे अनेक कारणं

लहान मुलांच्या श्वासाला जर घाणेरडा वास येत असेल, तर ही गंभीर बाब मानायला हवी, असं नवी दिल्लीच्या पीएसआरआय हॉस्पिटलमधील सीनिअर कन्सल्टंट आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. सरिता शर्मा सांगतात. दुर्गंधीमागचं सर्वात मोठं कारण असतं ते म्हणजे खाण्यापिण्याच्या सवयी

खाण्याच्या चुकीच्या सवयी

खाण्याच्या वेळा आणि खाण्याच्या पदार्थांची निवड चुकत असेल, तर तोंडाला दुर्गंधी येत असल्याचं डॉ. शर्मा सांगतात. विशेषतः चिप्स, चॉकलेट, कँडी यासारखे पदार्थ दाताला चिकटून बसतात. त्यामुळे दातांना कीड लागण्याची शक्यता असते. यामुळे तोंडाला दुर्गंधी येऊ लागते.

पाणी कमी पिणे

पाणी कमी प्रमाणात प्यायल्यामुळेदेखील तोंडाला वास येतो. अनेक मुलं सांगूनदेखील पाणी पित नाहीत. जेवण झाल्यावर किंवा दिवसभर अनेक मुलं पाणी प्यायचं टाळतात. त्याचा परिणाम त्यांच्या पचनक्रियेवर होतो. त्यामुळे त्यांचं पोटही साफ होत नाही आणि तोंडाला दुर्गंध येण्याचं प्रमाण वाढतं.

हे वाचा- वजन नियंत्रणात ठेवायचं आहे ना? मग नाष्ट्यात कधीही या गोष्टी खाऊ नका

रात्री ब्रश न करणे

सकाळी उठल्यावर केलेल्या ब्रशपेक्षाही रात्री ब्रश करणं अधिक गरजेचं असल्याचं डॉक्टर सांगतात. अनेक मुलं रात्रीचं जेवण झाल्यावर दात न घासताच झोपतात. त्यामुळे त्यांच्या तोंडाला दुर्गंधी तर येतेच, शिवाय त्यांचे दात किडून खराब होण्याची शक्यता बळावते. रात्री ब्रश करून झोपल्यामुळे दातात अडकलेले चिकट पदार्थ आणि अन्नाचे कण साफ होतात आणि दाताप्रमाणेच तोंडाचं आरोग्यही उत्तम राहायला मदत होते.

First published:

Tags: Food, Health, Lifestyle