Home /News /videsh /

अचानक स्वत:ला समजते 6 वर्षांची मुलगी, अन् प्रियकर होतो किडनॅपर, भयंकर असा हा आजार

अचानक स्वत:ला समजते 6 वर्षांची मुलगी, अन् प्रियकर होतो किडनॅपर, भयंकर असा हा आजार

आठवणी माणसाला जागरूक ठेवत असतात; मात्र विस्मृतीसारखे आजार माणसाची ही ताकदच हरवून टाकतात.

    नवी दिल्ली, 28 जून : विस्मृती ही खूपच भयंकर गोष्ट आहे. सामान्यपणे म्हातारपणी विस्मृतीचा त्रास जाणवायला लागतो; मात्र इंग्लंडमधल्या एका महिलेला लहान वयातच अशी विस्मृतीची समस्या भेडसावू लागली आहे. विस्मृती (Amnesia) झाल्यावर ती स्वतःला सहा वर्षांची लहान मुलगी (Woman Thinks Herself Tobe 6 Years Old) समजते. इतकंच नाही, तर ती तिच्या भावी जोडीदारालाही अनोळखी व्यक्ती समजते. द सन वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, 29 वर्षीय क्लोई बर्नार्ड गेल्या नऊ वर्षांपासून 39 वर्षांच्या जेम्ससोबत रिलेशनशिपमध्ये आहे. लेस्टशरमधल्या मेल्टन मोब्रे इथे ती राहते; मात्र क्लोईला अ‍ॅम्नेशियाचा (Amnesia) आजार आहे. त्यामुळे तिला विस्मरण होतं. क्लोई आणि जेम्स यांचं लग्नही होणार आहे; मात्र तिच्या आजारामुळे ती जेम्सला कधीकधी किडनॅपर किंवा गुन्हेगार समजते. क्लोईच्या अ‍ॅम्नेशियाच्या आजारानं आता गंभीर स्वरूप धारण केलं आहे. अ‍ॅम्नेशिया हा मेंदूशी निगडित आजार आहे. यात स्मृतिभ्रंश होतो. काही घटना, अनुभव, काही व्यक्ती किंवा त्यांच्याशी निगडित काही घटना संबंधित व्यक्ती विसरते. क्लोईची लक्षणं मात्र विचित्र आहेत. ती क्षणात सगळं विसरते आणि आराम करून झाल्यावर किंवा झोपून उठल्यावर तिला पुन्हा सगळं आठवायला लागतं. एकदा तिचं तिच्या भावी जोडीदारासोबत भांडण झालं होतं. त्यानंतर ती तिच्या खोलीत झोपायला गेली; मात्र झोपून उठल्यावर ती स्वतःला सहा वर्षांची मुलगी समजू लागली. खोलीतून बाहेर आल्यावर तिचा जोडीदार सोफ्यावर बसला होता. त्याला ती किडनॅपर समजली, असं क्लोईनं वेबसाइटला सांगितलं आहे. स्वतःला सहा वर्षांची मुलगी समजून ती आई-बाबांकडे जाण्याचा हट्ट करू लागली. त्या वेळी जेम्सला वाटलं, की प्रेमानं जवळ घेतलं, की क्लोई नॉर्मल होईल; पण तिनं घाबरून जेम्सला चाकूचा धाक दाखवला. ती त्याला मुलांचं शोषण करणारा गुन्हेगार समजू लागली. मग त्यानं तिला आई-वडिलांकडे नेलं. तिथं झोपून उठल्यानंतर क्लोई पुन्हा नॉर्मल झाली. क्लोईला अ‍ॅम्नेशियाचा त्रास 2018 मध्ये पहिल्यांदा जाणवू लागला. ती वडील आणि बॉयफ्रेंडसोबत एका बारमध्ये होती. तिथे टॉयलेटमधून बाहेर आल्यावर ती अचानक सगळं विसरली. ती टेबलपाशी आल्यावर तिला वाटलं, की वडिलांनी त्यांच्या मित्राला बोलावलं आहे. जेव्हा वडील त्या दोघांना तिथेच एकत्र ठेवून निघून गेले, तेव्हा तिला वाटलं की वडिलांनी आपल्याला अनोळखी माणसाला विकलं आहे. तिनं हळूच आईला फोन केला, तेव्हा आईनं तिला खरी गोष्ट सांगितली. तिनं शेवटपर्यंत तिच्या बॉयफ्रेंडला ओळखलं नाही. ताण (Stress) आणि अपुरी झोप यामुळे हा आजार झाल्याचं डॉक्टरांनी तिला सांगितलं आहे. साधारणपणे हा आजार झालेल्यांना आयुष्यात एखाद-दुसऱ्या वेळेला फिट्स येतात; पण क्लोईला मात्र दर दोन महिन्यांनी एकदा फीट येते.

    First published:

    Tags: England, Mental health, Stress

    पुढील बातम्या