Home /News /videsh /

पाकिस्तानात प्रेग्नेंट हिंदू महिलेची धक्कादायक डिलिव्हरी; डॉक्टरांनी बाळाचं डोकं कापून ठेवलं गर्भाशयातच

पाकिस्तानात प्रेग्नेंट हिंदू महिलेची धक्कादायक डिलिव्हरी; डॉक्टरांनी बाळाचं डोकं कापून ठेवलं गर्भाशयातच

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

पाकिस्तानात एका महिलेच्या डिलिव्हरीवेळी (Pakistan Woman Delivery) एक भयानक प्रकार झाल्याचं समोर आलं आहे.

     मुंबई, 21 जून-   पाकिस्तानात एका महिलेच्या डिलिव्हरीवेळी (Pakistan Woman Delivery) एक भयानक प्रकार झाल्याचं समोर आलं आहे. सिंध प्रांतातील एका ग्रामीण आरोग्य केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी डिलिव्हरी करताना भ्रूणाचं डोकंच कापलं. कहर म्हणजे त्यानंतर हे डोके महिलेच्या गर्भाशयातच (Head of Baby left in womb) सोडून दिलं. यानंतर या महिलेचा जीव जाण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, वेळीच दुसऱ्या रुग्णालयात नेल्यामुळे तिचा जीव वाचला आहे. आज तकने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. रविवारी ही घटना घडली होती. जमशोरो शहरातील लियाकत युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल अँड हेल्थ सायन्सेसमधील (LUMHS) स्त्री रोग विभागाचे प्रमुख डॉ. राहील सिकंदर यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले, ’32 वर्षांची ही भिल्ल हिंदू (Hindu woman delivery in Pakistan) महिला थारपारकर जिल्ह्यातील एका गावात राहते. ती त्यांच्या भागातील ग्रामीण आरोगय केंद्रात (Rural Health Centre) डिलिव्हरीसाठी गेली होती. या ठिकाणी स्त्रीरोग तज्ज्ञ उपलब्ध नव्हता. त्यामुळे अनुभव नसलेल्या कर्मचाऱ्यांनीच (Untrained Doctors Pakistan) तिची डिलिव्हरी केली. यावेळी हा भयानक प्रकार घडला.’ ऑपरेशन करून काढले मुंडकं आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी या महिलेच्या भ्रूणाचं डोकं कापलं (Pakistan woman horrible delivery) होतं. त्यानंतर बाकी शरीर बाहेर काढून, डोकं गर्भाशयातच ठेवलं. यानंतर तिची परिस्थिती आणखी खराब झाली. त्यामुळे तातडीने त्यांनी महिलेला नजीकच्या मीठी शहरातील रुग्णालयात नेले. मात्र, तिथेदेखील उपचारांची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अखेर तिला LUMHS मध्ये हलवण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी ऑपरेशन करून तिच्या पोटातून बाळाचं मुंडकं बाहेर काढलं. या महिलेचं गर्भाशयही तुटून गेलं होतं असंही डॉ. सिकंदर यांनी सांगितलं. महिलेचे फोटो व्हायरल- या सर्व प्रकारादरम्यान, ग्रामीण आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी या महिलेचे स्ट्रेचरवरील फोटो काढून ते व्हायरल केले गेल्याचेही म्हटलं जात आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची सिंध सरकारने गांभीर्याने दखल घेतली आहे. या घटनेच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी एका वैद्यकीय चौकशी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. सिंध आरोग्य सेवा विभागाचे महासंचालक डॉ. जुमान बहोतो यांनी या सर्व प्रकाराची स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले, की ग्रामीण आरोग्य केंद्रात स्त्री रोग तज्ज्ञ आणि महिला कर्मचारी यांच्या उपलब्धतेबाबत चौकशी करण्यात येणार आहे. तसंच, ही चौकशी समिती महिलेचे फोटो व्हायरल झाल्याबाबतही रिपोर्ट देणार आहे.
    First published:

    Tags: Pakistan, Viral news

    पुढील बातम्या