मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

जो बायडन विजयी झाले तरीही ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदावर कायम राहणार? US च्या संविधानात काय आहेत नियम

जो बायडन विजयी झाले तरीही ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदावर कायम राहणार? US च्या संविधानात काय आहेत नियम

...त्यामुळे यावर्षीचे निकाल देखील कोर्टाकडूनच ठरवले जातील असा अंदाज आहे.

...त्यामुळे यावर्षीचे निकाल देखील कोर्टाकडूनच ठरवले जातील असा अंदाज आहे.

...त्यामुळे यावर्षीचे निकाल देखील कोर्टाकडूनच ठरवले जातील असा अंदाज आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

वॉशिंग्टन, 6 नोव्हेंबर : अमेरिकेने ‘बनाना रिपब्लिक’ हा शब्द तयार केला आहे. बनाना रिपब्लिक म्हणजे राजकीय अस्थिरता असलेला देश. परंतु नुकत्याच अमेरिकन राष्ट्रध्यक्ष निवडणुकीत सध्या हीच परिस्थिती आहे. विद्यमान राष्ट्रध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी मतमोजणीदरम्यानच स्वतःला विजयी घोषित केले आहे. विरोधी पक्षावर घोटाळा केल्याचा आरोप करत ट्रम्प यांनी सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. तसंच आपणच राष्ट्रध्यक्ष राहणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. तर चला पाहुयात ट्रम्प यांच्या दाव्यात किती तथ्य आहे.

अमेरिकन निवडणुकीचे महत्त्व

अमेरिकन राष्ट्रध्यक्ष निवडणुकीकडे जगभरातील सर्वांचे लक्ष लागून असते. परंतु यावेळी सर्व लहान मोठ्या देशांनी ही निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. सत्तेत कोण येणार याचा  परराष्ट्र धोरणांवर खूप मोठा प्रभाव पडत असतो. चीन सध्या अनेक देशांवर दबाव आणत असून ट्रम्प आणि बायडन यांच्या निवडीमुळे या धोरणांवर मोठा प्रभाव पडणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्व जगाचे लक्ष लागून आहे.

मतमोजणी सुरु

न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार जो बायडन यांना 253  इलेक्टोरल वोट मिळाली आहेत. त्यामुळे बहुमतासाठी त्यांना केवळ 17 मतांची गरज आहे. तर दुसरीकडे ट्रम्प यांना 214 वोट मिळाली आहेत. त्यांना विजयी होण्यासाठी 56 वोट हवे आहेत. त्यामुळे सध्याच्या आकडेवारीनुसार बायडन आघाडीवर आहेत. परंतु हे गणित पलटू शकतं.

हे ही वाचा-US Election 2020 : काय आहे रोबोकॉल ज्यानं वाढवली ट्रम्प आणि बायडन यांची चिंता

ट्रम्प यांना आहे विश्वास

मेल-इन- बॅलेटमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करत ट्रम्प यांनी या मतमोजणीला विरोध केला आहे. ही सगळी मते डेमोक्रॅट्स पक्षाला मिळाली असल्याने ट्रम्प यांच्या या दाव्याला बळ मिळत आहे. यामुळे ट्रम्प यांनी सुप्रीम कोर्टात देखील जाण्याचा निर्णय घेतला आहे. कोर्टाच्या तपासानंतर ते विजयी होणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

हे आहेत आकडे

पोस्टल बॅलेटमधील मते ही मते डेमोक्रट्सकडे वळताना दिसून येत आहेत. अमेरिकेमध्ये एकूण 240 मिलियन मतदार आहेत. यामध्ये 91 मिलियन मतदारांनी 1 नोव्हेंबरपर्यंत मतदान केलं होतं. त्यामुळे डेमोक्ट्रॅट्सला साथ देणाऱ्या 60 टक्के मतदारांनी मतदानासाठी हाच मार्ग निवडला आहे.

प्रकरण कोर्टात जाऊ शकते

ट्रम्प समर्थक या पद्धतीला या शतकातील सर्वात मोठा घोटाळा म्हणत आहेत.  एखाद्या मतदारानी जर वेगळा पत्ता दिला आणि सही वेगळी केली तर ही गोष्ट संदिग्ध समजली जाते. त्यामुळे या पद्धतीच्या मतांचा आधार घेऊन ट्रम्प बायडनना कोर्टात खेचू शकतात.

सुरूवातीपासून कोर्टाचा सहभाग

नुकतेच अमेरिकी सिनेटमध्ये सुप्रीम कोर्टाच्या नव्या न्यायाधीशांच्या निवडीसाठी मतदान पार पडले. यामध्ये ट्रम्प यांचा पाठिंबा असलेल्या एमी कोनी बॅरेट यांनी विजय मिळवला. त्यामुळे ट्रम्प यांची बाजू मजबूत दिसून येत आहे. अमेरिकेत राजकीय प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात सुप्रीम कोर्टाचा हस्तक्षेप आढळून आला आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी अमेरिकेत कोणत्याही प्रकारचा विशेष नियम बनवण्यात आलेला नाही. त्यामुळे निवडणुकीशी संबंधित अनेक प्रकरणे कोर्टात जात असतात. याचा संदर्भ Election Meltdown: Dirty Tricks, Distrust, and the Threat to American Democracy  या पुस्तकात देखील देण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षीचे निकाल देखील कोर्टाकडूनच ठरवले जातील असा अंदाज आहे.

सत्ता हस्तांतरणावर देखील प्रश्नचिन्ह

ट्रम्प यांचा पराभव झाला तरीदेखील ते पदावर राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अमेरिकेच्या संविधानात देखील ट्रान्सफर ऑफ पॉवरसंदर्भात कोणतीही स्पष्टता नाही. अमेरिकन संविधानातदेखील शांततेत सत्ता हस्तांतरणाचा कोणताही कायदा नाही. त्यामुळे पराभूत झाल्यानंतर एखाद्या राष्ट्रपतींनी सत्ता सोडण्यास नकार दिला तर यासाठी अमेरिकेच्या संसदेत कोणताही कायदा नाही.

First published:

Tags: President of america, US elections