जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / काश्मीरच्या मुस्लिमांसाठी आवाज उठवू, तालिबानचा 24 तासांत यू-टर्न

काश्मीरच्या मुस्लिमांसाठी आवाज उठवू, तालिबानचा 24 तासांत यू-टर्न

काश्मीरच्या मुस्लिमांसाठी आवाज उठवू, तालिबानचा 24 तासांत यू-टर्न

काश्मीरमधील (Kashmir) मुस्लिमांच्या (Muslim) प्रश्नात आम्ही नक्की लक्ष घालू, असं विधान तालिबानचे प्रवक्ते (Taliban spokesperson) सुहेल साहिन (Suhel Sahin) यांनी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

काबुल, 3 सप्टेंबर : अफगाणिस्तानात (Afghanistan) तालिबानची (Taliban) सत्ता आल्यामुळे भारतासमोरची आव्हानं वाढण्याची शक्यता आहे. काश्मीरमधील (Kashmir) मुस्लिमांच्या (Muslim) प्रश्नात आम्ही नक्की लक्ष घालू, असं विधान तालिबानचे प्रवक्ते (Taliban spokesperson) सुहेल साहिन (Suhel Sahin) यांनी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तालिबानने 24 तासांतच आपल्या भूमिकेवरून घूमजाव केल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. काय म्हणाले सुहेल साहिन जगात जिथे जिथे मुस्लीम राहतात, त्या प्रत्येकाच्या संरक्षणासाठी आणि अधिकारांसाठी तालिबान सज्ज असल्याचं तालिबानचे प्रवक्ते सुहेल साहिन यांनी म्हटलं आहे. केवळ भारतातच नव्हे, तर जगात ज्या ज्या भागात मुस्लिमांवर अन्याय होत असेल, त्यांच्या बाजूने आम्ही उभे राहू आणि त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न करत राहू, असं साहिन यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे. 24 तासात यू-टर्न तालिबानचे वरिष्ठ नेते अनास हक्कानी यांनी गुरुवारी दिलेल्या मुलाखतीत तालिबान भारताच्या कुठल्याही अंतर्गत प्रश्नात लक्ष घालणार नसल्याचं म्हटलं होतं. काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतर्गत प्रश्न असून तालिबानचा त्याच्याशी काहीही संबंध नसल्याची प्रतिक्रिया तालिबानच्या वरीष्ठ नेत्यांनी दिली आहे. मात्र तालिबानचे प्रवक्ते आता वेगळीच भाषा बोलू लागल्यामुळे संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे. हे वाचा - अरेच्चा हेच का ते! उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंगने बदलला look कराराचं उल्लंघन होणार? अमेरिकेने अफगाणिस्तानातून माघार घेताना तालिबानसोबत करार केला होता. या करारातील एक तरतुदीनुसार तालिबानने अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर कुठल्याही इतर देशाविरुद्ध करणार नसल्याचं आश्वासन दिलं आहे. भारतालादेखील तालिबानकडून हेच आश्वासन देण्यात आलं आहे. मात्र वरिष्ठ नेते एक भाषा बोलत असताना तालिबानाचे प्रवक्ते मात्र वेगळीच भाषा बोलत असल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. तालिबान जाणीवपूर्वक हे प्रकार करत असून जगभरातील मुस्लिमांची सहानुभूती मिळवण्यासाठी अशी उलटसुलट विधाने केली जात असल्याचं राजकीय अभ्यासकांचं मत आहे. भारतानं मात्र अद्याप सुहेल साहिन यांच्या विधानावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तालिबानकडून देण्यात आलेली अधिकृत प्रतिक्रिया वेगळी असल्याने साहिन यांच्या या विधानाबाबत तालिबान काही खुलासा करतं का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात