एका कार्यक्रमात किम जोंग उन यांना डोक्यावर पट्टी बांधलेलं बघितलं गेलं होतं, तेव्हापासून या हुकूमशाची तब्येत बिघडल्याच्या चर्चा सुरू होत्या.
2/ 7
कोरियन सेंट्रल न्यूज एजेन्सीनुसार उत्तर कोरियाची अर्थव्यवस्था कोरोनाकाळात डबघाईला आली आहे. आता अशातच उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनने युवावर्गात उत्साह निर्माण करण्यासाठी त्यांनी आपला लुक बदलला आहे.
3/ 7
यावेळी त्याने देशासाठी कठीण पद्धतीने काम करणाऱ्या युवावर्गाची स्तुती केली आहे.
4/ 7
कोरियन सेंट्रल न्यूज एजेंसीनुसार किम जोंग उन याचं वजन 10 ते 20 किलोनी कमी झालं आहे. त्यामुळे त्याच्या आरोग्याबाबत ज्या बातम्या येत होत्या त्या खऱ्या ठरल्या आहेत.
5/ 7
कोरियाची राजधानी सियोलस्थित कोरिया इन्स्टिट्यूट फॉर नॅशनल यूनिफिकेशनचे वरिष्ठ विश्लेषक होंग मिन यांच्या मते किम जोंग उन आजारी असल्याच्या बातम्यांनंतर आता ही त्यांची इमेज बदलण्यासाठी केलेली कृती आहे.
6/ 7
किम जोंग उन यांच्या आरोग्य आणि वजनाबाबत अनेक अफवा उडाल्या होत्या, परंतू आता त्याचं वजन कमी होण्याचं कारण त्याची कुठलीतरी सर्जरी झालेली दिसते. असं डिकिन विद्यापीठाचे आतंकवादविरोधी विशेषज्ञ ग्रेग बार्टन यांनी म्हटलंय.
7/ 7
ग्रेग बार्टन यांनी किमविषयी बोलताना पुढे म्हटलं आहे असं होऊ शकतं कि किम आपल्या वजनाबाबत चिंतेत असेल आणि तो वजन कमी करत असावा. असा अंदाज आहे. किमला दारू आणि सिगारेटचेही व्यसन आहे, अशीही माहिती समोर आली आहे.