Home /News /videsh /

'Texas Synagogue' नाट्यातील चारही नागरिक सुरक्षित, मात्र अपहरणकर्त्याच्या मृत्यूचं गूढ वाढलं

'Texas Synagogue' नाट्यातील चारही नागरिक सुरक्षित, मात्र अपहरणकर्त्याच्या मृत्यूचं गूढ वाढलं

टेक्सासच्या सिनेगॉगमध्ये चौघांचं अपहरण करणारा ठार तर झाला, मात्र त्याला नेमकं मारलं कुणी, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहे.

    टेक्सास, 16 जानेवारी: पाकिस्तानी दहशतवादी (Pakistan Terrorist) आणि शास्त्रज्ञाच्या सुटकेसाठी चार ज्यू नागरिकांचं अपहरण (Abduction of 4 Jew citizens) केलेल्या अमेरिकी नागरिकाचा मृत्यू (Death of abductor) नेमका कसा झाला, याचं गूढ वाढलं आहे. अपहरण झालेल्या चौघांचीही प्रकृती उत्तम असून ते सुरक्षित असल्याची माहिती अमेरिकी प्रशासनाने दिली आहे. पाकिस्तानी शास्त्रज्ञाच्या सुटकेसाठी अमेरिकेच्या टेक्सासमध्ये हे अपहरण नाट्य रंगलं होतं.  काय आहे प्रकरण? पाकिस्तानी-अमेरिकी शास्त्रज्ञ आफिया सिद्दीकी ही सध्या अमेरिकेच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. दहशतवादी कृत्यासाठी तिला 86 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या अफिया सिद्दीकीची सुटका करण्यात यावी, या मागणीसाठी मोहम्मद सिद्दीकीनं चार ज्यू लोकांना टेक्सासच्या एका सिेनेगॉगमध्ये बंदी बनवून ठेवलं. सिद्दीकीकडं काही शस्त्रास्त्रं आणि बॉम्बदेखील होते. या घटनेनं अमेरिकेत एकच खळबळ उडाली आणि FBI चे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र त्यानंतर जे काही घडलं, त्याबाबत अधिकाऱ्यांमध्येच एकवाक्यता नसल्याचं दिसून येत आहे.  अपहरणकर्त्याला कुणी मारलं? अपहरणकर्त्याला नेमकं कुणी मारलं, हा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. टेक्सासच्या सिनेगॉगमध्ये अपहरणकर्त्यानं चौघांना ओलिस ठेवलं होतं. त्यातील एकाने दुपारीच स्वतःची सुटका करून घेतली. इतरांच्या सुटकेसाठी FBI ची टीम रात्री नऊच्या सुमाराला सिनेगॉगमध्ये गेली, तेव्हा तिघे समोरून पळत येताना दिसले. त्यांच्या मागून हल्लेखोरही येत असल्याचं सांगण्यात आलं. या घटनेनंतर मात्र जोरदार फायरिंग सुरू झाल्याचे आणि स्फोटांचे काही आवाज ऐकू आले. मात्र प्रत्यक्षात काय घडलं, याबाबत संभ्रम निर्माण झाला.  हे वाचा - अपहरणकर्ता ठार, पण… या धुमश्चक्रीत अपहरणकर्ता तर ठार झाला, मात्र नेमक्या कुठल्या अधिकाऱ्याने त्याला मारलं,या प्रश्नाचं उत्तर द्यायला FBI नं सध्या नकार दिला आहे. तो स्वतःच केलेल्या स्फोटात मारला गेला की अधिकाऱ्यांच्या गोळीने त्याचा मृत्यू झाला, याविषयी स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. लवकरच याबाबत खुलासा केला जाईल, असं अमेरिकेनं स्पष्ट केलं आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Afghanistan, America, Pakisatan, Shot dead, Terrorist

    पुढील बातम्या