नवी दिल्ली, 16 मार्च: सध्या रशियाचा (Russia) युक्रेन (Ukraine) घशात घालण्याचा प्रयत्न सुरूय. हे युद्ध तिसऱ्या महायुद्धाची नांदी तर ठरणार नाही ना, अशी अनेकांना भीती वाटतं आहे. अमेरिकेनेही रशियाच्या आक्रमक भूमिकेवर आक्षेप घेतलाय. मात्र, रशियाने आपले हे युद्ध सुरुच ठेवले आहे. अचानक उद्भवलेल्या या युद्धावर भारताने (India) आपली निष्पक्ष भूमिका कायम ठेवली. मात्र, अमेरिकेचे सर्व लक्ष्य हे भारताकडे आहे. भारत नेमकी कोणती आणि काय भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अशातच व्हाइट हाउसकडून मोठा खुलासा झाला आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेकेट्री ने आपल्या मीडिया ब्रीफिंगमध्ये काही गोष्टींचा खुलासा केला आहे. जगातील देशांनी विचार केला पाहिजे की या काळातील घडामोडींवर भविष्यात इतिहासाची पुस्तके लिहिली जातील, तेव्हा त्या सर्व देशांनी विचार केला पाहिजे की त्यांना कोणत्या बाजूने उभे रहायचे आहे. सध्या, रशियन नेतृत्वाला पाठिंबा देणे ही विनाशकारी प्रभावासह हल्ल्यासाठी दिलेली सूट आहे. असे प्रेस सेक्रेट्रीने म्हटले आहे. तसेच, भारत कच्च्या तेलाबाबत रशियन ऑफर कशी स्वीकारेल हे अमेरिकेचे मुळ चिंतेचे कारण आहे. भारताने रशियाचा प्रस्ताव स्वीकारला तर आर्थिक आघाडीवर परिस्थिती नियंत्रणात ठेवणे त्यांच्यासाठी कठीण होईल, असे अमेरिकी प्रशासनाला वाटत असल्याचे प्रेस सेक्रेट्रीने म्हटले आहे.
India not violating sanctions, but Russian oil deal could place New Delhi on 'wrong side of history': US
— ANI Digital (@ani_digital) March 16, 2022
Read @ANI Story | https://t.co/JW2E9prXlk#UkraineRussiaCrisis #RussianOilDeal #RussianUkrainianWar pic.twitter.com/E3BbPLnlw6
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांच्या प्रवक्त्या जेन पास्की यांनी म्हटले आहे की, भारताने रशियाकडून कच्च्या तेल खरेदी केल्यास अमेरिकेने लादलेल्या कोणत्याही निर्बंधांचे उल्लंघन होत नाही. याच पत्रकार परिषदेदरम्यान भारत अमेरिकेच्या निर्बंधांचे उल्लंघन करत नसून, रशियाच्या तेल कराराने नवी दिल्ली इतिहासात चुकीच्या दिशेने नेऊ नये, असेही त्यांनी म्हटले आहे. पत्रकार परिषदेत, पास्की यांना रशियाकडून कमी किमतीत कच्च्या तेलाची खरेदी केल्याच्या वृत्तांबद्दल विचारले असता ते म्हणाल्या, कोणत्याही देशाला आमचा संदेश असेल की, आमच्याद्वारे लादलेल्या निर्बंधांचे पालन करावे. म्हणजे मला विश्वास आहे की हे त्याचे उल्लंघन होणार नाही. ज्यो बायडन यांनी रशियातून तेल, कोळसा आणि वायू आयात करण्यावर बंदी घातली आहे. युरोपियन कमिशन तीन मोठ्या रशियन तेल कंपन्यांवर देखील निर्बंध लादणार असल्याची बातमी आली होती, परंतु अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्याकडून तेल खरेदीवर बंदी घातली जाणार नाही. भारतातील परिस्थिती रशियाच्या दूतावासाने म्हटले आहे की रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोवाक यांनी गेल्या आठवड्यात हरदीप सिंग पुरी यांच्याशी रशियाच्या ऊर्जा क्षेत्रातील भारताच्या गुंतवणुकीबाबत चर्चा केली आहे. नोवाक आणि पुरी यांच्यातील चर्चेबाबत भारत सरकारने मात्र मौन बाळगले आहे. युक्रेनसोबतच्या युद्धादरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मोठी घोषणा करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांच्यावर बंदी घातली आहे. यासोबतच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनाही रशियात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.