जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / अफगाणिस्तानातील सरकारी कर्मचाऱ्यांचं भवितव्य काय? तालिबानची मोठी घोषणा

अफगाणिस्तानातील सरकारी कर्मचाऱ्यांचं भवितव्य काय? तालिबानची मोठी घोषणा

तालिबाननं अफगाणिस्तानावर ताबा (Taliban Control Afghanistan) मिळवल्यापासून देशातील परिस्थिती अधिक बिकट बनली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातील सरकारी कर्मचाऱ्यांचं भवितव्य टांगणीला लागलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

काबूल, 17 ऑगस्ट: तालिबाननं अफगाणिस्तानावर ताबा (Taliban Control Afghanistan) मिळवल्यापासून देशातील परिस्थिती अधिक बिकट बनली आहे. तालिबानी संघटनेच्या जाचक कायद्यांच्या भीतीनं अनेक नागरिक देश सोडून पलायन करण्याच्या प्रयत्नात आहेत. पण काबूलहून होणारी सर्व विमान उड्डाणांवर बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानात हजारो नागरिक अडकून पडले आहेत. अशात अफगाणिस्तानातील सरकारी कर्मचाऱ्यांचं (government employees) काय होणार याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. पण तालिबान संघटनेनं याबाबत मोठी घोषणा केली आहे. तालिबाननं अफगानिस्तानातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी सार्वजानिक माफीची घोषणा केली आहे. तसे मंगळवारी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे कार्यालयात जावं असे आदेशही देण्यात आले आहेत. कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यानं घाबरायची गरज नाहीये. त्यांना कोणताही धोका नाही. सर्वांनी मंगळवार पासून कामावर यावं, असं तालिबानकडून सांगण्यात आलं आहे. हेही वाचा- पार्कमध्ये खेळताना दिसले तालिबानी; गाड्यांवर, घोड्यावर बसून मस्ती करतानाचे VIDEO अफगाणिस्तानवर पूर्णपणे ताबा मिळवल्यानंतर तालिबानची दहशतीची अनेक उदाहरणं समोर येत आहेत. देश सोडून जाण्यासाठी अनेकांनी विमानतळावर गर्दी केली होती. त्यामुळे सर्वत्र चेंगराचेंगरी देखील झाली आहे. तालिबानच्या भीतीनं पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांची वर्दी उतरवली आहे. तसेच ते आता घर सोडून भूमिगत झाले आहेत. याव्यतिरिक्त तालिबाननं आता सरकारी कर्मचारी, पोलीस आणि लष्करी अधिकारी, पत्रकार आणि परदेशी स्वयंसेवी संस्थांशी संबंधित लोकांचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. हेही वाचा- VIDEO: काबूल विमानतळावर येण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीवर तालिबानीकडून गोळीबार अमेरिकेचा तालिबानला इशारा अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारी घेतल्यानंतर काल रात्री पहिल्यांदाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एक निवेदन जारी केलं आहे. या निवेदनात ते म्हणाले की, अफगाणिस्तानातील परिस्थिती अचानक बदलली आहे. त्याचा इतर देशांवरही परिणाम झाला आहे, परंतु दहशतवादाविरोधातील आमची लढाई अशीच सुरू राहील. जर अमेरिकन नागरिकांना अफगाणिस्तानात काहीही धोका झाला तर, त्वरित कारवाई केली जाईल, अशा इशारा जो बायडन यांनी तालिबानला दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात