इस्रायलमध्ये (Israel) जवानांना सेक्स सरोगेट थेरपी (Sex Surrogate Therapy)दिली जात असून, त्या विषयाची मोठी चर्चा होत आहे. युद्धामध्ये जखमी होऊन विकलांग झालेल्या आणि आत्मविश्वास गमावून बसलेल्या जवानांच्या लैंगिक पुनर्वसनासाठी (Sexual Rehabilitation) इस्रायलचं सरकार स्वतःच्या खर्चाने ही थेरपी करत आहे. ही एक कपल थेरपी असून ज्यात जखमी जवानाच्या लैंगिक पुनर्वसनासाठी सरोगेट महिला किंवा पुरुष साथीदार दिले जातात. ते या जवानांचा लैंगिक क्रियेतला गमावलेला आत्मविश्वास हळूहळू पूर्वपदावर आणण्यास मदत करतात.
जगातअनेक देशांमध्ये अनेक वेळा सेक्स सरोगेट थेरपीची चर्चा झाली आहे; मात्र अनेक ठिकाणी या थेरपीकडे वेश्या व्यवसाय म्हणून पाहिलं जातं. इस्रायलमध्ये मात्र प्रत्यक्ष सरकारच वेगवेगळ्या युद्धांमध्ये जखमी विकलांग झालेल्या,आत्मविश्वास गमावलेल्या जवानांच्या लैंगिक पुनर्वसनासाठी या थेरपीचा वापर करतं. चारही बाजूंनी अरब देशांनी वेढलेला इस्रायल हा एकमात्र ज्यू (Jew Country)देश आहे. सातत्याने होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांना तोंड देतानाकिंवा स्वतःच छेडलेल्या युद्धात हा देश कायम व्यग्र असतो.
त्यामुळे अनेक जवान गंभीर जखमी होतात. काही जणांची स्थिती इतकी गंभीर असते, की लैंगिक संबंधही (Sexual Intercourse)त्यांना ठेवता येत नाहीत. त्यांची तशी मनःस्थितीही नसते. अशा जवानांवर सेक्स सरोगेट थेरपीद्वारे उपचार केले जातात. त्यात जखमी जवानाला एक साथीदार (Sex Surrogate Partner)दिला जातो. तो साथीदार त्या जवानाला हळूहळू शारीरिक संबंध ठेवेपर्यंतच्या स्थितीपर्यंत येण्यास मदत करतो. अनेक जवानांचे पाय जायबंदी झालेले असतात. अशा जवानांना व्हीलचेअरवर बसूनही ही थेरपी दिली जाते.
या थेरपीसाठी जवान आणि त्याचा साथीदार यांना एका विशेष खोलीत ठेवलं जातं. ही खोली हॉटेलच्या खोलीपेक्षा वेगळी असते. त्यात अशा प्रकारची डिझाइन्स असतात, की एकंदर माहौल घरासारखाच भासेल. जवानाला कम्फर्टेबल वाटण्यासाठी तशी रचना केलेली असते. त्या खोलीत बाथरूमही असते. भिंतींवर वेगवेगळ्या प्रकारची चित्रं चितारलेली असतात.
हे ही वाचा-इस्रायलनं Mask वरील निर्बंध उठवले, पहिल्यासारखं सुरु झालं सर्वांचं आयुष्य
या थेरपीत मुख्य लक्ष यावर केंद्रित केलं जातं,की जवान आपल्या मनातली भीती सोडून साथीदाराशी नातं जोडण्यासाठी पुढे यावा. स्पर्श, गुजगोष्टी आदींच्या पद्धतीही शिकवल्या जातात. अर्थात, जवान लैंगिक संबंध ठेवण्यासाठी मानसिकदृष्ट्या पुन्हा पूर्णपणे तयार होण्याच्या स्थितीपर्यंतच हे चालतं,नंतर थांबवलं जातं.
बीबीसीच्या वृत्तात या लैंगिकपुनर्वसनाबद्दल विस्ताराने लिहिण्यात आलं आहे. समजा,एखादा जवान विवाहित आहे. युद्धात जखमी झाल्यानंतर तो विकलांग आणि मानसिकदृष्ट्या कमजोर झाल्यानंतर पत्नीशी लैंगिक संबंध ठेवण्यातही त्याला सहजता राहत नाही. तसंच, दोघांनाही कोणा प्रोफोशनल थेरपिस्टकडेही जायचं नसतं. अशा स्थितीत सरकारकडून त्यांना ही थेरपी दिली जाते.
ही थेरपी सुरू होण्याआधी जवान आणि त्याच्याशी थेरपीद्वारे जोडला जाणार असलेला सेक्स सरोगेट साथीदारयांना तज्ज्ञांकडून निर्देश दिले जातात. हे तज्ज्ञ लैंगिक पुनर्वसन याविषयातले जाणकार असतात. त्या जवानाची गरज नेमकी काय आहे आणि त्याच्या साथीदाराने त्याला नेमकी कशी मदत केली पाहिजे,हे तज्ज्ञ सांगतात.
थेरपीच्या सेशननंतर फीडबॅक दिला जातो,जेणेकरून आगामी काळात या थेरपीचा जवानांच्या लैंगिक पुनर्वसनासाठी अधिक चांगल्या प्रकारे वापर करता येऊ शकेल. इस्रायलचं संरक्षण खातं (Defence Ministry)जखमी जवानांच्या पुनर्वसनाचा खर्च उचलतं,तसंच त्यांच्या लैंगिक पुनर्वसनाचा खर्चही उचलतं. अनेक जवानांकरिता ही थेरपी अनेक महिनेही चालू असते. साधारणपणे लैंगिक पुनर्वसन कार्यक्रम तीन महिन्यांचा असतो आणि त्याचा खर्च सुमारे चार लाख रुपये असतो.
इस्रायलच्यासेक्स थेरपिस्ट रोनित अलोनी (Ronit Aloni)सेक्स सरोगेट थेरपीवर खूप कामकरत आहेत. बीबीसीने घेतलेल्या इंटरव्ह्यूत त्यांनी याबद्दल माहिती दिली.सध्या तेल अवीवमध्ये त्यांचं ऑफिस असून,तिथेच त्या कार्यरत आहेत.न्यूयॉर्कमध्ये शिक्षण घेत असताना रोनित यांना या थेरपीबद्दल माहितीमिळाली. तिथून मायदेशी परतल्यानंतर त्यांनी जवानांच्या पुनर्वसनासाठी याथेरपीचा वापर करण्याबद्दल धार्मिक नेत्यांशी चर्चा केली. त्यांनी थेरपीलामान्यता दिली;मात्र एक नियमही त्या वेळी घालण्यात आला. कोणीही विवाहितव्यक्ती (स्त्री किंवा पुरुष) सेक्स सरोगेट पार्टनर म्हणून या थेरपीमध्येसहभागी होऊ शकणार नाही. अजूनही या नियमाचं पालन करून ही थेरपी इस्रायलमध्येवापरली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.