Home /News /videsh /

'आम्ही तर जमिनीवरही व्यायाम करीत नाही'; अंतराळातील वर्कआऊट VIDEO पाहून मजेदार प्रतिक्रिया

'आम्ही तर जमिनीवरही व्यायाम करीत नाही'; अंतराळातील वर्कआऊट VIDEO पाहून मजेदार प्रतिक्रिया

अंतराळवीरदेखील विशिष्ट प्रकारचा व्यायाम (Workout in Space) करून स्वतःला हेल्दी ठेवण्याचा प्रयत्न करतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका अंतराळवीराचा व्हिडिओ (Space workout viral video) व्हायरल होत आहे.

    नवी दिल्ली, 20 सप्टेंबर : अंतराळात गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे साध्या साध्या गोष्टी करणंही अवघड़ होतं. वेगळ्या प्रकारचं अन्न, जास्त हालचाल न करणं, अशा बऱ्याच गोष्टींमुळे अंतराळवीरांच्या तब्येतीवर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. यामुळे अंतराळवीरदेखील विशिष्ट प्रकारचा व्यायाम (Workout in Space) करून स्वतःला हेल्दी ठेवण्याचा प्रयत्न करतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका अंतराळवीराचा व्हिडिओ (Space workout viral video) व्हायरल होत आहे. यात तो आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर (International space station) वर्कआउट करताना दिसून येत आहे. थॉमस पेस्क्वेट (Thomas Pesquet) असं या अंतराळवीराचं नाव आहे. फ्रान्सच्या (French astronaut viral video) या अंतराळवीराने आपल्या ट्विटर अकाउंटवरून (@Thom_astro) हा व्हिडिओ शेअर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, थॉमस सध्या मिशन अल्फासाठी (Mission Alpha) प्रशिक्षण घेत आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनसाठी हे दुसरं मिशन असेल. थॉमस नेहमीच स्पेस स्टेशनमधले विविध व्हिडिओ (Astronaut viral video) आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करत असतात. ट्विटरवर त्यांचे 1.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. 'आज तक'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. हे ही वाचा-ऐकावं ते नवलच, चक्क Google Maps वरून सापडली सोन्याची खाण? थॉमस यांनी शेअर केलेल्या या 41 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये ते अंतराळात व्यायाम (Workout in Space) करताना दिसत आहेत. ट्विटर युझर्स त्यावर विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. 18 सप्टेंबरला थॉमस यांनी हा व्हिडिओ शेअर केला होता. यानंतर आतापर्यंत या व्हिडिओला एक लाखांहून अधिक व्ह्यूज (Space workout video) मिळाले आहेत. कित्येक ट्विटर युझर्स फिटनेसबद्दल थॉमस यांचं असलेलं डेडिकेशन पाहून प्रभावित झाले आहेत. ते कमेंट्समध्ये थॉमस यांचं कौतुकही करत आहेत. थॉमस यांनी यापूर्वीही अंतराळ स्थानकावरचे (International space station videos) बरेच व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केले आहेत. यासोबतच त्यांनी अंतराळ स्थानकावरून पृथ्वीचे टिपलेले फोटोही शेअर केले आहेत. त्यांचे फोटो आणि व्हिडिओंना मोठ्या प्रमाणात रिट्विट केलं जातं. व्यायाम करतानाच्या त्यांच्या व्हिडिओलाही हजारो लाइक्स मिळाले आहेत. या व्हिडिओमध्ये ते स्पेस स्टेशनवरच्या एका विशिष्ट मशीनच्या मदतीने वर्कआउट करत आहेत. त्यांना वर्कआउट करताना पाहून कित्येक जण आश्चर्यही व्यक्त करत आहेत. 'कित्येक लोक जमिनीवर असातानाही व्यायाम करत नाहीत आणि तुम्ही चक्क अंतराळात वर्कआऊट करत आहात,' अशा आशयाच्या कमेंट्सही अनेक जण करताना दिसत आहेत.
    First published:

    Tags: Live video, Space, Spacecraft, Workout

    पुढील बातम्या