• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • ऐकावं ते नवलच, चक्क Google Maps वरून सापडली सोन्याची खाण?

ऐकावं ते नवलच, चक्क Google Maps वरून सापडली सोन्याची खाण?

खरंच तो खजिनाच असेल, म्हणजे सोन्याची खाणच असेल, तर त्या युझरचं नशीब फळफळू शकतं.

खरंच तो खजिनाच असेल, म्हणजे सोन्याची खाणच असेल, तर त्या युझरचं नशीब फळफळू शकतं.

खरंच तो खजिनाच असेल, म्हणजे सोन्याची खाणच असेल, तर त्या युझरचं नशीब फळफळू शकतं.

 • Share this:
   मुंबई, 18 सप्टेंबर : जगभरात ट्रेझर हंटर्स ( Treasure Hunter) अर्थात गुप्त खजिना शोधणाऱ्यांच्या कहाण्या अनेकदा सांगितल्या जातात. कधी कधी कित्येक वर्षांच्या शोधानंतर खजिने सापडतात, तर कधी अचानकच कोणाला किमती वस्तू सापडतात; पण आता अशा खजिन्यांच्या शोधासाठी कुठे भटकण्याची गरज नाही. आता कोणीही घरबसल्या मोबाइल फोनवरूनही खजिना शोधू शकतं. यासाठी गरज आहे ती फक्त गुगल मॅप्सची (Google Maps). रेडिट (Reddit) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका युझरने असा दावा केला आहे, की त्याने गुगल मॅप्सच्या साह्याने सोन्याची खाण शोधून काढली आहे. आपण सोन्याच्या ज्या खाणीचा शोध लावला, तिचा फोटो त्या युझरने रेडिटवर शेअर केला आहे. अमेरिकेच्या एका जंगलात सोन्याची ही खाण लपलेली आहे, असं त्याचं म्हणणं आहे. त्या युझरने शेअर केलेला फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून इंटरनेट युझर्सना आश्चर्य वाटत आहे. त्या फोटोत हिरव्यागार झाडांमध्ये चमकणारी काही वस्तू दिसत आहे. ती वस्तू म्हणजे सोन्याची खाण (Gold Mine) आहे, असा त्या रेडिट युझरचा दावा आहे. या फोटोचं नेमकं लोकेशन अद्याप कळलेलं नाही; मात्र युझर्समध्ये त्या फोटोबद्दल प्रचंड उत्सुकता असल्याचं पाहायला मिळत आहे. PAK vs NZ : इम्रान खान हात-पाय पडले, तरी न्यूझीलंडच्या पंतप्रधान ऐकल्या नाहीत! व्हायरल झालेल्या या फोटोवरून (Viral Photo) ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर चर्चा रंगल्या आहेत, वादही झडत आहेत. काही नागरिक त्याबद्दल उत्सुकता व्यक्त करत आहेत. त्या फोटोवर एकापाठोपाठ एक अशा अनेक कमेंट्स आल्या आहेत. एका युझरने असं लिहिलं आहे, की हे एका कहाणीसारखं असू शकतं, ज्यात एका जंगलात सोन्याच्या नाण्यांचं भांडार सापडलं होतं. काही जणांनी कमेंट करून हे लोकेशन अधिक जवळून शोधून, त्याबद्दल अधिक माहिती घेण्याचा सल्ला दिला आहे. खरंच तो खजिनाच असेल, म्हणजे सोन्याची खाणच असेल, तर त्या युझरचं नशीब फळफळू शकतं. काही जणांनी मात्र हे फोटो सोन्याचे किंवा सोन्याच्या खाणीचे नसल्याचं कमेंटमध्ये म्हटलं आहे. हिरव्या जंगलात (Forest) मध्येच असलेलं ते एक पिवळ्या रंगाचं झाड आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. काही जण म्हणतायत, की हा केवळ सूर्यप्रकाशामुळे होत असलेला दृष्टिभ्रम आहे. झाडावर सूर्यप्रकाश पडून तो परावर्तित होत आहे. त्यामुळे असं चकचकीत दिसत आहे, असं त्या युझरने म्हटलं आहे. पर्यटनामुळे दाम्पत्य झाले कोट्यवधी; समुद्रावर मज्जा-मस्ती करताना आयुष्य बदललं गेल्या काही कालावधीपासून गुगल मॅप्सच्या साह्याने वेगवेगळ्या आणि चित्रविचित्र वस्तू किंवा स्थळं शोधली जात असल्याचे किंवा सापडली असल्याचे दावे केले जात आहेत. त्यात आता सोन्याच्या कथित खाणीने आणखी एकाची भर पडली आहे.
  First published: