जकार्ता, 28 डिसेंबर : माणसाच्या जीवाचं कधी, कुठे, कसं, काय होईल सांगू शकत नाही. अगदी चालताबोलताही माणसांचा जीव जातो. नुकताच एक असा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात एक व्यक्ती चालता चालता अक्षरशः बॉम्बसारखी फुटली. ही संपूर्ण भयंकर दुर्घटना कॅमेऱ्यात कैद झाली (Lightning strike video).
ही घटना इंडोनेशियाच्या जकार्तातील आहे (Indonesia Lightning strike video). एका व्यक्तीवर वीज कोसळली आणि क्षणार्धात बॉम्ब फुटावा तसा ब्लास्ट झाला. हे खतरनाक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं.
व्हिडीओत पाहू शकता पाऊस पडतो आणि आणि एक व्यक्ती हातात छत्री घेऊन चालताना दिसते आहे. थोड्याच वेळात आकाशातून वीज येते ती थेट या व्यक्तीवर कोसळते आणि मोठा ब्लास्ट होतो. त्यानंतर ही व्यक्ती जमीनवर कोसळलेली दिसते. तिला पाहताच तिथं उपस्थित असलेले काही लोक त्या व्यक्तीच्या मदतीसाठी धावत जातात.
हे वाचा - Shocking! चालता चालताच पुतळा बनलं जिवंत हरिण; VIDEO पाहूनच हादराल
@Heritzal नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार ही व्यक्ती एका कंपनीतील सुरक्षारक्षक आहे. पावसात हातात छत्री धरून चालताना ती वॉकी-टॉकीवर बोलतही होती. त्यामुळेच तिच्या अंगावर वीज कोसळली. काही युझर्सनी छत्रीमुळेही वीज कोसळण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
Security officer in Jakarta was struck by lightning while on duty, avoid using radio and cellular telephones when it is raining, the condition of the victim survived after 4 days of treatment. not everyone has the same chance to live. 当選確率 #Bitcoin #NFTs $BTC $ETH #ALERT pic.twitter.com/4XhW6Oh3U9
— Lexus RZ (@Heritzal) December 26, 2021
झी न्यूजने डेटिक न्यूजचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार इतक्या भयंकर दुर्घटनेनंतरही सुदैवाने ही व्यक्ती बचावली आहे. पण या व्यक्तीचा हात भाजला आहे, तिला तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि आता डिस्चार्जही देण्यात आला आहे.
हे वाचा - Shocking Video! खेळणं म्हणून खेळत राहिला; चिमुकल्याला अजगराने घातला विळखा
या व्यक्तीचं नशीब बलवत्तर म्हणून वीज कोसळूनही ती जिवंत आहे. पण प्रत्येक वेळी नशीब साथ देईलच असं नाही. त्यामुळे पावसात अशी दुर्घटना आपल्यासोबत घडू नये, यासाठी आपणच काळजी घ्यायला हवी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indonesia, Shocking viral video, Viral, Viral videos, World news