तब्बल 8 वर्षांनी 'या' गावात झाला बाळाचा जन्म, लोकसंख्या फक्त 29!

तब्बल 8 वर्षांनी 'या' गावात झाला बाळाचा जन्म, लोकसंख्या फक्त 29!

एकीकडे संपूर्ण जगासाठी 2020 हे वर्ष वाईट ठरत असले तरी, या गावासाठी मात्र एक आनंदाची बातमी घेऊन आले आहे.

  • Share this:

लोम्बार्डी, 22 जुलै : चीन आणि भारत यांसारख्या देशांची वाढती लोकसंख्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. लोकसंख्येच्या बाबतीत, चीन पहिल्या तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दुसरीकडे, इटलीमधील एका गावात तब्बल 8 वर्षांनी बाळाचा जन्म झाला आहे. नवजात बाळाचा जन्म झाल्यावर जणु गावात एखाद्या सणासारखे वातावरण होते. लोकांनी आपली घरं सजवली होती, अगदी धुमधडाक्यात या बाळाचे स्वागत करण्यात आले.

इटलीच्या लोम्बार्डी प्रांतातल्या या मॉर्टोर्नो या गावात रविवारी एका मुलाचा जन्म. या मुलाचे नाव 'डेनिस' ठेवण्यात आले आहे. या नवजात बाळाच्या जन्मानंतर या गावाची लोकसंख्या आता चक्क 29 झाली आहे.मॉर्टोर्नोच्या महापौर अँटोनिला इनवर्नीझी यांनी एका स्थानिक वृत्तपत्राला याबाबत माहिती देत, संपूर्ण गाव आनंदी असल्याचेही सांगितले.

वाचा-299KM/h वेगानं सुसाट पळवली सुपरबाईक, तरुणासोबत काय घडलं पाहा VIDEO

मुख्य म्हणजे या गावात बाळाचा जन्म झाल्यानंतर रिबन कापून या बाळाचे स्वागत केले जाते. अशाच प्रकारे डेनिसचे बाबा मॅटो आणि आई सारा यांनी निळ्या रंगाची फित कापून बाळाचे स्वागत केले. या गावातील पंरपरेनुसार मुलगी जन्माला आल्यास गुलाबी रंगाची तर मुलगा जन्मास आल्यावर निळ्या रंगाची फित कापली जाते. एकीकडे संपूर्ण जगासाठी 2020 हे वर्ष वाईट ठरत असले तरी, या गावासाठी मात्र एक आनंदाची बातमी घेऊन आले आहे.

वाचा-समुद्र किनाऱ्यावर खेळत होता चिमुरडा मागून आला शिकारी शार्क आणि...

मुख्य म्हणजे लोम्बार्डी हा कोरोनाचा हॉटस्पॉट होता. मात्र मॉर्टोर्नोवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही, असे येथील महापौरांनी सांगितले. रिपोर्टुनासर, डेनिसचे वजन 2.6 किलोग्राम आहे. डेनिसची आई सारानं सांगितले की, हॉस्पिटलमधून घरी परत आल्यावर संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण होते. या आनंदात सामील झालेल्या प्रत्येक व्यक्तीचे तो मनापासून स्वागत करेल.

वाचा-आता घरीही तुम्ही कोरोना संसर्गापासून सुरक्षित नाही, तज्ज्ञांचा नवा दावा

मुख्य म्हणजे डेनिसचा जन्म अशा काळात झाला, जेव्हा इटलीचा जन्मदर विक्रमी घट नोंदवली होती. सन 2019 मध्ये इटलीमध्ये एकूण 4, लाख 20 हजार 170 बाळांचा जन्म झाला होता, ही संख्या 1861 नंतरची सर्वात कमी आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: July 22, 2020, 1:11 PM IST

ताज्या बातम्या