मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

VIDEO : आयडियाची कल्पना, या व्यक्तीने लढवली कोरोनाला दूर ठेवण्याची नवी शक्कल

VIDEO : आयडियाची कल्पना, या व्यक्तीने लढवली कोरोनाला दूर ठेवण्याची नवी शक्कल

कोरोनाला दूर ठेवण्यासाठी नागरिकांकडून विविध प्रयत्न केले जात आहे. त्यातच या व्यक्तीची आयडिया सरस ठरू शकते

कोरोनाला दूर ठेवण्यासाठी नागरिकांकडून विविध प्रयत्न केले जात आहे. त्यातच या व्यक्तीची आयडिया सरस ठरू शकते

कोरोनाला दूर ठेवण्यासाठी नागरिकांकडून विविध प्रयत्न केले जात आहे. त्यातच या व्यक्तीची आयडिया सरस ठरू शकते

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 16 मार्च : कोरोनाव्हायरसचा (coronavirus) कहर जगभरात वाढत आहे. हे टाळण्यासाठी अनेक देशांनी सार्वजनिक ठिकाणी जास्त गर्दी होऊ नये म्हणून खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. इटलीमध्ये परिस्थिती बरीच वाईट आहे. तिथले लोक कोरोना टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत.

इटलीच्या रोम शहरात एका व्यक्तीने कोरोना टाळण्यासाठी असा काही  प्रयत्न केला आहे की, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

संबंधित - FACT CHECK : 'कोरोना'मुळे भारतात लॉकडाऊन; सोशल मीडियावर मेसेज, काय आहे तथ्य?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये हा माणूस इटलीतील रोम शहरातील बाजारात फिरताना दिसत आहे. त्याने संक्रमित लोकांना दूर ठेवण्यासाठी उपाय करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. यासाठी त्याने कार्ड बोर्डचा एक मोठा तुकडा मध्यभागी गोलाकारात कापला. यानंतर त्या गोलाकार भाग स्वत:भोवती पसरवला. हा कार्ड बोर्ड त्याच्या सभोवताली सुमारे 1 मीटरभर पसरला आहे.

या कारणामुळे लोक त्याच्याजवळ येऊ शकत नाहीत. कोणतीही व्यक्ती त्याच्यापासून 1 मीटर दूर राहते. जेव्हा हे घालून तो बाजारात आला, तेव्हा लोकांनी त्याचा व्हिडीओ केला आणि हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

इटलीमध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे आतापर्यंत 1809 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच, संक्रमित झालेल्यांची संख्या 17,000 पर्यंत पोहोचली आहे. इटली आणि स्पेनमधील परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.

संबंधित -  आनंदाची बातमी, कोरोनाला दूर ठेवण्यात महाराष्ट्रातील 442 जण ठरले यशस्वी!

अधिकृत आकडेवारीनुसार, कोरोनाच्या संसर्गामुळे इटलीमध्ये एकाच दिवसात 368 लोक मरण पावले असून एका दिवसातील मृतांचा हा आकडा सर्वात जास्त आहे. इटलीनंतर कोरोनाच्या प्रादुर्भावात स्पेन हा युरोपमधील दुसर्‍या क्रमांकावर आहे.

स्पेनमध्ये रविवारी कोरोना संसर्गाच्या सुमारे 2 हजार नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर गेल्या 24 तासांत 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

घराबाहेर पडण्यावर बंदी 

स्पेनने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात संक्रमित व्यक्तींची संख्या 7,753 वर पोहोचली असून त्यापैकी 288 लोकांचा मृत्यू झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता सरकारने देशभरात जवळपास सर्वच नागरिकांना क्वारंटाईनमध्ये राहण्यास सांगितले आहे. लोकांना कामावर जाण्यास, खरेदी करण्यास व घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.

संबंधित -  VIDEO : कोरोना दुसऱ्या स्टेजला, उद्धव ठाकरे म्हणाले, आता स्वयंशिस्त पाळा!

First published:

Tags: Coronavirus, Coronavirus update