मुंबई, 16 मार्च : संपूर्ण शटडाउन नको असेल तर, स्वयंशिस्त पाळा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. सगळ्यासाठी कायदा करकता येत नाही, असं सांगत त्यांनी राज्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यात Coronavirus चा प्रादुर्भाव वाढतो आहे. साथीचा हा दुसरा टप्पा आहे. त्यादृष्टीने उपाययोजना म्हणून परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. शाळा- कॉलेज बंद राहतील. हे टोटल शटडाउन आहे का, नेमकं काय सुरू राहणार आणि काय राहणार बंद? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद