टेक्सास, 12 फेब्रुवारी: अमेरिकेतील टेक्सासमधील (Texas) फोर्ट वर्थ (Fort Worth Deadliest Accident) या भागातून जाणाऱ्या फ्री वेवर म्हणजे हायवेवर 100 गाड्या एकमेकांवर धडकून झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यु झाला आहे. यामध्ये अंदाजे 65 जण जखमी झाले आहेत. आय-35 या रस्त्यावर सकाळी सहा वाजता हा अपघात झाला असून अनेक जण गाड्यांमध्ये अडकून पडले आहेत अशी माहिती फोर्ट वर्थ पोलिसांनी दिली. तीन गंभीर जखमींसह 36 जणांना घटनास्थळावरून रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. अनेकांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं तर अनेक जण घटनास्थळाहून स्वत: निघून गेले आणि नंतर रुग्णालयात भरती झाले. या अपघातातील सर्व जण प्रौढ होते, असंही पोलिसांनी सांगितलं. अंग गोठवणाऱ्या थंडीत पडणाऱ्या पावसामुळे आय-35 या फोर्ट वर्थ हायवे निसरडा झाला होता. रस्ता निसरडा झाल्यामुळे आणि धुक्यामुळे समोरचे दिसत नसल्यामुळे या 100 कार एकमेकांवर आदळून हा अपघात झाला असावा असा फोर्ट वर्थ पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
Preliminary information on MCI in Fort Worth. More info will be released later. At least 100 vehicles involved, 5 fatalities, 36 transported to local hospitals. #yourFWFD continues to work the incident and will be on scene for several hours. pic.twitter.com/DUtRJFKSI9
— Fort Worth Fire Department (@FortWorthFire) February 11, 2021
‘आजच्या अपघातात मोठी हानी झाली आहे त्यामुळे नागरिकांना भोगायला लागणारा त्रास पाहून माझ्या मानाला प्रचंड वेदना होता आहेत. तुमच्यापैकी अनेक जण मदतीसाठी धावा करत असतील आणि आपल्या समाजातील अनेक जण मदतीसाठी पुढे धावून आले आहेत. आता फोर्ट वर्थला गरज आहे ती अपघातात मृत झालेल्या, जखमी झालेल्या आणि त्याचा फटका बसलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांसाठी तुम्ही केलेल्या प्रार्थनांची,’ असं ट्वीट फोर्ट वर्थच्या महापौर बेट्सी प्राइस यांनी केलं आहे.
अमेरिकेत गेल्या तीन दशकांमध्ये मोठे इंटरस्टेट अपघात झाल्याचा इतिहास आहे. 14 मे 1988 ला केंचुकीतील काराल्टोनजवळ दारु प्यालेल्या ड्रायव्हरने गाडी धडकवल्याने 27 जणांचा मृत्यु झाला होता त्यात 24 लहान मुलांचा समावेश होता. टेनेससीमधील कॅलहॉनमध्ये 11 डिसेंबर 1990 ला 75 गाड्या धुक्यामुळे एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात 12 जणांना प्राण गमवावा लागला होता. कॅलिफोर्नियातील कोलिंगाच्या जवळ 29 नोव्हेंबर 1991 ला धुळीच्या वादळामुळे 5 गाड्या एकमेकांवर आदळल्याने 17 जणांना प्राणाला मुकावं लागलं होतं