न्यूयॉर्क, 04 फेब्रुवारी: अमेरिकन हवाई दल, कमांडो आणि रीपर ड्रोन यांनी गुरुवारी सीरियामध्ये (Syria) मोठी लष्करी कारवाई केली. यामध्ये इस्लामिक स्टेटचा (( Islamic State)कमांडर इब्राहिम अल-हाश्मी अल-कुरेशी (Abu Ibrahim al-Hashimi al-Qurayshi) ठार झाला आहे. अमेरिकेच्या हवाई हल्ल्यादरम्यान (US Air Strike) हाशिमीने स्वत:ला बॉम्बने उडवलं. या हल्ल्यात महिला आणि लहान मुलांसह एकूण 13 जणांचा मृत्यू झाला आहे. सीरियात ISIS म्होरक्या अबू इब्राहिम अल-हाशिमी अल-कुरैशीला (ISIS Leader Abu Ibrahim Al Hashimi Al Qurayshi) ठार मारल्याचा दावा अमेरिकेनं गुरुवारी केला. स्वतः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी ट्विट करून याची पुष्टी केली आहे. बायडेन म्हणाले कि, काल रात्री माझ्या आदेशानुसार अमेरिकेच्या सैन्याने जगासाठी मोठा दहशतवादी धोका असलेल्या इसिसच्या जागतिक नेत्याला ठार केलं. बायडेन यांनी ट्विटमध्ये लिहिलं कि, “माझ्या सूचनेनुसार काल रात्री अमेरिकन सैन्य दलांनी दहशतवादविरोधी मोहीम यशस्वीपणे पार पाडली. सशस्त्र दलांच्या शौर्याबद्दल धन्यवाद, आम्ही इसिसचा नेता अबू इब्राहिम अल-हाशिमी अल-कुरैशी याला ठार केलं आहे. आपल्या जवानांच्या शौर्यामुळे हा कुख्यात दहशतवादी नेता या जगात नाही.
Last night at my direction, U.S. military forces successfully undertook a counterterrorism operation. Thanks to the bravery of our Armed Forces, we have removed from the battlefield Abu Ibrahim al-Hashimi al-Qurayshi — the leader of ISIS.
— President Biden (@POTUS) February 3, 2022
https://t.co/lsYQHE9lR9
अमेरिकन प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, मिशनमधील सर्व अमेरिकन सुखरूप परतले आहेत. हे संपूर्ण ऑपरेशन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि राष्ट्राध्यक्षांच्या राष्ट्रीय सुरक्षा दलानं थेट लाईव्ह पाहिलं. अबु इब्राहिम अल-हाशिमी अल-कुराशी, ज्याला अब्दुल्ला करदाश किंवा हाजी अब्दुल्ला म्हणूनही ओळखलं जातं, हा माजी ISIS प्रमुख अबू बकर अल-बगदादीच्या मृत्यूनंतर संघटनेचा नेता बनला. अबू बकर अल-बगदादीने देखील 2019 मध्ये बारीशा शहराजवळ अमेरिकन सैन्यानं केलेल्या अशाच हल्ल्यात स्वतःला स्फोट घडवून उडवलं. बगदादीनंतर संघटनेची कमान घेतली होती हाती AP या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री सीरियामध्ये अमेरिकेच्या विशेष दलाने केलेल्या हल्ल्यात इस्लामिक स्टेट गटाचा प्रमुख मारला गेला. अमेरिकेच्या हल्ल्यात अबू बकर अल-बगदादी मारला गेल्यानंतर 31 ऑक्टोबर 2019 रोजी दहशतवादी संघटनेची सूत्रे हाती घेतलेल्या अबू इब्राहिम अल-हाशिमी अल-कुरैशीला या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आलं.