S M L

मुलांनो, कॉम्प्युटर सोडा, मैदानावर जा, अमेरिकेत पालकांनी सुरू केली मोहीम!

डिजिटल साधनांच्या अतिवापराचे दुष्परिणाम दिसू लागल्यानं अमेरिकेत शाळेंमधल्या मुलांनी मैदानावर जावं यासाठी प्रयत्न होत आहेत.

Ajay Kautikwar | Updated On: Apr 25, 2018 04:36 PM IST

मुलांनो, कॉम्प्युटर सोडा, मैदानावर जा, अमेरिकेत पालकांनी सुरू केली मोहीम!

वॉशिंग्टन,ता.20 एप्रिल: सध्याचं युग हे डिजिटलचं असलं तरी त्याच्या वापराचं तारतम्य सुटलं आणि त्याचे दुष्परिणाम दिसू लागले. डिजिटल साधनं वापरण्यात सर्व जगात अमेरिका आघाडीवर आहे. अमेरिकेतल्या शाळांमध्ये तर नर्सरीपासूनच मुलांनासाठी डिजिटल साधानांचा वापर करतात. या वापराला आता काही दशकं झाली आहेत. त्याचे दुष्परिणाम दिसून येत असून मुलांनी आता डिजिटल दुनियेपासून दूर राहात मैदानावर जावं असं आवाहन पालकांच्या संघटनांनी केलंय.

अमेरिकेतल्या मेरिलँड राज्यानं 'स्कूल डिव्हाईस बील' मंजूर केलंय. त्यामुळं मुलं शाळेत जेवढा वेळ घालवतात त्यापैकी फक्त अर्धाच वेळ आता डिजिटल साधनांसमोर राहणार आहेत. अशा प्रकारचं विधेयक आणणारं मेरिलँड हे पहिलच राज्य आहे.शाळेंमध्ये आणि घरात मुलं, कॉम्प्युटर,लॅपटॉप, मोबाईल आणि विविध टॅबलेट्स वापरतात. त्याचं व्यसनच मुलांना लागलं असून तासं तास मुलं आपला वेळ त्यावर घालवू लागली आहेत.

त्यामुळं मुलांचं मैदानावर खेळणं थांबलं, शरीराची हालचाल थांबली. डोळ्यांच्या आजारात वाढ झाली. रात्री उशीरापर्यंत जागरण होत असल्यानं मुलांध्ये निद्रानाशाचा आजारही वाढला. त्याचे परिणाम मुलांच्या शारीर आणि मनावर होत असल्यानं पालक आणि शाळांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. शिक्षक आणि पालकांच्या तक्रारीत वाढ झाल्यानं अनेक पालक संघटनांनी पुढाकार घेत मोहीमच छेडली असून या राज्यासारखच इतर राज्यांनी त्याचं अनुकरण करावं अशी मागणी आता जोर धरते आहेत.

मुलांना कॉम्प्युटर, मोबाईपासून कसं दूर ठेवाल?

- गरज असेल तेव्हाच मुलांना मोबाईल द्या.

Loading...

- कॉम्प्युटर, मोबाईलवर मुलं किती वेळ घालवतात आणि काय पाहतात याकडे लक्षं ठेवा.

- सलग कॉम्प्युटरवर न बसता दर अर्ध्या तासाने मुलांना थोडं दूर जायला सांगा.

- मुलं जास्तित जास्त मैदानावर खेळतील हे कटाक्षानं बघा.

बेल्जियमध्ये 'प्ले आऊट साईड डे'

मुलांमध्ये जडलेलं डिजिटल साधनांचं व्यसन सोडवण्यासाठी बेल्जियमध्ये दर वर्षी 'प्ले आऊटसाईड डे' साजरा केला जातो. त्या दिवशी टेलिव्हिजनवर मुलांसाठीचे शो दाखवले जात नाहीत. मुलांना मैदानावर जाण्याचं आवाहन केलं जातं. दर बुधवारी पूर्ण बेल्जियममध्ये मुलांना खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्या जातात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 20, 2018 06:59 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close