मराठी बातम्या /बातम्या /देश /

पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा परिणाम, शेतकरी संघटनांची आज मोठी बैठक?

पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा परिणाम, शेतकरी संघटनांची आज मोठी बैठक?

आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) यांनी केलेल्या आवाहानाचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे.

आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) यांनी केलेल्या आवाहानाचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे.

आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) यांनी केलेल्या आवाहानाचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे.

  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 26 डिसेंबर :  दिल्लीच्या (Delhi) कडाक्याच्या थंडीत कृषी सुधारणा कायदा (Agriculture reform laws) रद्द करावा या मागणीसाठी शेतकरी संघटनांचं गेल्या महिनाभरापासून तळ ठोकून आहेत. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) यांनी केलेल्या आवाहानाचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. या विषयावर आज, शनिवारी शेतकरी संघटनांची बैठक होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं पाठवलेल्या चर्चेच्या नव्या प्रस्तावावर शेतकरी संघटनांनी शुक्रवारच्या बैठकीत चर्चा केली. या बैठकीनंतर या संघटनांकडून काही संकेत मिळाले आहेत. त्यानुसार शेतकरी संघटना लवकरच सरकारशी चर्चा सुरु करण्याची शक्यता आहे. शनिवारच्या बैठकीत याबातचा औपचारिक निर्णय होऊ शकतो. (हे वाचा-LPG बाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता, डिसेंबरमध्ये आधीच महागला आहे घरगुती गॅस) शेतकरी संघटनेच्या नेत्यानं याबाबत सांगितले की, 'केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांच्या पत्रावर शनिवारच्या बैठकीमध्ये चर्चा होईल. यापूर्वीच्या सरकारनं पाठवलेल्या पत्रांमध्ये कोणताही नवा प्रस्ताव नव्हता. त्यामुळे शेतकरी संघटनांनी सरकारची चर्चोची विनंती फेटाळली होती.' (हे वाचा-तुम्ही ITR फाइल केला का? ही आहे शेवटची तारीख, 3.97 कोटी करदात्यांनी भरला रिटर्न) 'कृषी सुधारणा कायद्यातील तीन सुधारणा रद्द करण्याच्या आमच्या मागणीला MSP पासून वेगळं करु नये,' असं मत अन्य एका शेतकरी नेत्यानं व्यक्त केले आहे. नव्या कायद्यामध्ये खासगी मंडीचा उल्लेख आहे. आमचं धान्य निश्चित MSP वर विकण्यात येईल याची खात्री कोण देणार? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. कृषी मंत्रालयाला विश्वास शेतकरी संघटना येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये वाटाघाटीच्या टेबलावर येतील असा विश्वास कृषी मंत्रालयातील एका अधिकाऱ्यानं व्यक्त केला आहे. शिक्षणतज्ज्ञांची पंतप्रधानांकडे मागणी कृषी सुधारणा कायद्यातील मुदयावरुन आंदोलक शेतकरी आणि सरकार यांच्यात गेल्या महिनाभरापासून तोडगा निघालेला नाही. या परिस्थितीमध्ये या कायद्याच्या समर्थनासाठी देशातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी पुढं येत आहेत. देशातील प्रमुख शिक्षण संस्थांमधल्या मंडळींनी (Academicians) या सुधारणांना पाठिंबा देणारं एक पत्र  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) पत्र लिहिलं आहे. देशातील 34 प्रमुख शिक्षण तज्ज्ञांनी हे पत्र लिहलं आहे. कृषी सुधारणा करण्याची योग्य वेळ आली असल्याची आमची खात्री झाली आहे,'
First published:

Tags: Farmer, PM Naredra Modi

पुढील बातम्या