मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीदरम्यान उमेदवाराचा मृत्यू झाल्यास पुढे काय?

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीदरम्यान उमेदवाराचा मृत्यू झाल्यास पुढे काय?

अमेरिकेची राष्ट्राध्यपदाची निवडणूक (US Presidential Election) जवळ आलेली असताना अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष आणि आगामी निवडणुकीतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (donald trump) कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

अमेरिकेची राष्ट्राध्यपदाची निवडणूक (US Presidential Election) जवळ आलेली असताना अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष आणि आगामी निवडणुकीतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (donald trump) कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

अमेरिकेची राष्ट्राध्यपदाची निवडणूक (US Presidential Election) जवळ आलेली असताना अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष आणि आगामी निवडणुकीतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (donald trump) कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

  • Published by:  Priya Lad

वॉशिंग्टन, 04 ऑक्टोबर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (us president donald trump) यांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. पुढील काही तास त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षाची निवडणूक तोंडावर असताना डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना झाला आहे. अशा परिस्थितीत राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार निवडणूक लढवण्यास असमर्थ असेल किंवा उमेदवाराचा मृत्यू झाला तर त्याचा निवडणुकीवर काय परिणाम होतो, निवडणुकीत कसे बदल होतात पाहुयात.

3 नोव्हेंबर 2020 ची निवडणूक पुढे ढकलली जाईल?

असं होण्याची शक्यता फारच कमी आहे.अमेरिकेच्या घटनेत कॉंग्रेसला निवडणुकीची तारीख निश्चित करण्याचा अधिकार दिला आहे. यू.एस. अंतर्गत कायद्यानुसार नोव्हेंबरमध्ये येणाऱ्या पहिल्या मंगळवारी निवडणूक होते. कायदे आणि नियमांनुसार दर चार वर्षांनी ही निवडणूक घेण्यात येते. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचा मृत्यू झाल्यास सद्यस्थितीत सिनेटमध्ये बहुमत असलेल्या रिपब्लिकन पक्षाने जरी तारीख पुढे ढकलायची मागणी केली तरीही हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजमध्ये बहुमत असलेला डेमोक्रॅटिक पक्ष तसं होऊ देणार नाही. आतापर्यंतदेखील निवडणूक पुढे ढकलण्यात आलेली नाही.

निवडणुकीपूर्वी उमेदवाराचा मृत्यू झाल्यास काय होतं?

डेमोक्रॅटिक पक्षाची राष्ट्रीय समिती आणि  रिपब्ललिकन पक्षाची राष्ट्रीय समिती  या दोघांचेही याबाबत नियम आहेत. हे दोन्ही पक्ष आपल्या मतदारांना बदली उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन करतात. पण सद्यस्थितीत बदली उमेदवार जाहीर करण्यासाठीची वेळ निघून गेली आहे.

हे वाचा - हॉस्पिटलमध्येही डोनाल्ड ट्रम्प घेऊन गेले फुटबॉल; क्षणात उद्ध्वस्त करू शकतात जग

या वेळी कोरोना महामारीमुळे बहुतांश मतदान ई-मेलने मतदान करणार आहेत. 50 पैकी 24 राज्यांतील मतदारांना मतपत्रिका पोहोचल्या आहेत. बऱ्याच राज्यांतील मतपत्रिका बदलण्याची तारीखही उलटून गेली आहे. पोस्टानी होणारं मतदानही काही प्रमाणात झालं आहे. आता जनता सध्याच्या उमेदवारांनाच मतं देईल. याधील जर विजेता 3 नोव्हेंबरपर्यंत मरण पावला तर नवीन प्रश्न उपस्थित राहू शकतात.

इलेक्टोरल कॉलेजच्या मतदानापूर्वी एखाद्या उमेदवाराचा मृत्यू झाल्यास काय होते?

इलेलेक्टोरल कॉलेज सिस्टीम अंतर्गत 50 राज्यं आणि कोलंबिया जिल्हा यांच्या लोकसंख्येप्रमाणे इलेक्टोरल मतं ठरवून दिली आहेत. ती मतं ज्याला सर्वाधिक मिळतील तो विजेता ठरेल. इलेक्टोरल कॉलेजचे सदस्य 14 डिसेंबरला अध्यक्ष निवडीसाठी मतदान करणार आहेत. अध्यक्षांना विजयी होण्यासाठी  इलेक्टोरल कॉलेजच्या एकूण 538 मतांपैकी  270 मतं मिळवणं गरजेचं असेल.

हे वाचा - अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रकृती विषयी White Houseने केला मोठा खुलासा

जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या ग्रॅज्युएट स्कूल ऑफ पॉलिटिकल मॅनेजमेंटच्या संचालिका लारा ब्राउन यांनी सांगितलं की, एखाद्या उमेदवाराचा मृत्यू झाल्यास विरोधी पक्ष न्यायालयात मतदाराच्या बदलीसाठी मत देण्याची परवानगी द्यावी असं आव्हान करू शकतो. मग न्यायालय काय भूमिका घेतं हे पाहवं लागेल. पण जर इलेक्ट्रोरल मतदानात स्पष्ट बहुमत दिसत असेल कोणताही पक्ष जनमताविरुद्ध जाणार नाही.

इलेक्टोरल कॉलेजचे मतदान झाल्यानंतर विजेत्याचा मृत्यू झाल्यास

जर एखाद्या उमेदवाराने जास्तीत जास्त मतांनी निवडणूक जिंकली आणि मग त्याचा मृत्यू झाला तर परिस्थिती कशी सोडवली जाईल हे पूर्णपणे स्पष्ट केलेलं नाही. घटनेच्या 20 व्या दुरुस्तीनंतरच्या नियमानुसार उपाध्यक्ष हे अध्यक्ष होऊ शकतात. मात्र निवडणूक कॉलेजचं मत उपाध्यक्षांनी जिंकलं असेल  किंवा कॉंग्रेसने प्रमाणित केलं तरच औपचारिकपणे तो अध्यक्ष होऊ शकतो. आतापर्यंत फक्त 1872 मध्ये अध्यक्षपदाच्या विजेत्या उमेदवाराचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर तशी परिस्थिती उद्भवलेली नाही.

कॉंग्रेसने निकाल दिल्यानंतर निवडलेल्या अध्यक्षाचा मृत्यू किंवा असमर्थ ठरल्यास काय होते?

अमेरिकी घटनेनुसार काँग्रेसने प्रमाणित केल्यानंतर  2 आठवड्यांनी म्हणजे 20 जानेवारीला म्हणजे इनॉग्रेशन डेला नवे अध्यक्ष शपथ घेतात. या मधल्या दोन आठवड्यांच्या काळात निवडून आलेल्या अध्यक्षांचा मृत्यू झाला तर उपाध्यक्ष  त्यांच्याऐवजी अध्यक्षपदाची शपथ घेतात.

First published:

Tags: Donald Trump, US President