कोरोना हॉस्पिटलमध्येही डोनाल्ड ट्रम्प घेऊन गेले फुटबॉल; क्षणात उद्ध्वस्त करू शकतात जग

कोरोना हॉस्पिटलमध्येही डोनाल्ड ट्रम्प घेऊन गेले फुटबॉल; क्षणात उद्ध्वस्त करू शकतात जग

कोरोना पॉझिटिव्ह डोनाल्ड ट्रम्प (donald trump) यांनी रुग्णालयात जाताना आपल्यासह हा फुटबॉल नेला आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 04 ऑक्टोबर : कोरोना पॉझिटिव्ह (coronavius) असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (us president) डोनाल्ड ट्रम्प (donald trump) यांच्यावर सध्या आर्मी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि यादरम्यानदेखील त्यांनी आपल्यासोबत तो फुटबॉल (football) ठेवला आहे, जो एका क्षणात संपूर्ण जगाचा विध्वंस करू शकतो. डोनाल्ड ट्रम्प कोणत्याही देशाच्या दौऱ्यावर जाताना हा फुटबॉल त्यांच्यासोबत असतो. आताही उपचारासाठी रुग्णालयात जाताना डोनाल्ड ट्रम्प हा फुटबॉलही सोबत घेऊन गेल्याचं सांगितलं जातं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह असलेला हा फुटबॉल कोणता खेळायचा फुटबॉल नाही. तर ही एक ब्रीफकेस आहे. काळ्या रंगाची असलेली ब्रीफकेस जगातील सर्वात ताकदवान ब्रीफकेस मानली जाते.  या ब्रीफकेसला न्युक्लिअर फुटबॉल (nuclear football) असंही म्हटलं जातं.

10 मे 1963 मध्ये पहिल्यांदा या ब्रीफकेसचे फोटो समोर आले होते. 1962 च्या क्युबा मिसाइल संघर्षानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष नेहमी न्यूक्लिअर फुटबॉल सोबत ठेवतात. व्हॉइट हाउसमधून बाहेर पडताना राष्ट्राध्यक्षांसोबत फुटबॉल असतो. व्हाइट हाउसशिवाय राष्ट्राध्यक्षांकडे याचे क्लोन असते. आपत्कालीन परिस्थितीमध्ये याचा वापर केला जातो.

हे वाचा - ट्रम्प यांच्यासाठी 48 तास महत्त्वाचे, वाचा डॉक्टरांना कोणत्या गोष्टीची काळजी

यामध्ये अमेरिकेच्या अणू हल्ल्याच्या लाँच कोडसह आणखी काही गोष्टी असतात. अमेरिकेच्या अणू हल्ल्याची पूर्ण योजना, टार्गेटची माहिती एका पुस्तकात लिहिलेली असते. एखाद्या हॉटेलचं मेन्यूकार्ड असावं अशी माहिती यामध्ये लिहिलेली आहे.

आणखी एक काळ्या रंगाचं पुस्तक या ब्रीफकेसमध्ये असतं. यामध्ये हल्ला झाल्यास लपण्याच्या ठिकाणांची माहिती देण्यात आली आहे. ट्रम्प यांच्या या ब्रीफकेसमध्ये एक आपत्कालीन ब्रॉडकास्ट सिस्टीमही आहे. न्युक्लिअर फुटबॉलमध्ये एक कार्ड असतं ज्यामध्ये अणू हल्ल्यासाठी कोड लिहिलेले असतात. दिसायला क्रेडिट कार्डसारखं असलेल्या या कार्डला बिस्किट असं म्हटलं जातं. यामध्ये 5 अलार्म असतात. कार्ड हरवलं तर तो वाजवले जातात. ब्रीफकेसमध्ये एक अँटिना लावलेला असतो. यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जगातील कोणत्याही भागात संपर्क साधू शकतात.

हे वाचा - ट्रम्प यांनी प्रवास केलेल्या Air Force Oneच्या केबिनमध्येही व्हायरसची बाधा

अणू हल्ला करण्याचा निर्णय जर घ्यावा लागला तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सर्व माहिती ब्लॅक बुकमध्ये मिळते. त्यामध्ये जगाचा नकाशा असतो आणि कोणत्या ठिकाणी हल्ला करायचा ते ठरवायचं असतं.

Published by: Priya Lad
First published: October 4, 2020, 7:30 PM IST

ताज्या बातम्या