वॉशिंग्टन 04 ऑक्टोबर: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप (Donald Trump) कोरोना बाधित झाल्यानंतर आता दोन व्हाईट हाऊसने (White House) मोठा खुलासा केला आहे. अध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रकृती विषयी जेवढी माहिती दिली गेली त्यापेक्षा त्यांची प्रकृती जास्त वाईट होती असं White Houseचे चीफ ऑफ स्टाफ मार्क मीडोज यांनी रविवारी सांगितले. ‘फॉक्स न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही कबूली दिली.
ते म्हणाले शुक्रवारी ट्रम्प यांना निदान झाल्यानंतर त्यांना जास्त तापही होता आणि रक्तातलं ऑक्सिजनचे प्रमाणही झपाट्याने कमी होत होतं. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आता मात्र त्यांची प्रकृती खपूच चांगली आहे. सध्या त्यांना ताप नाही आणि त्यांच्या रक्तातलं ऑक्सिजनचं प्रमाणही योग्य आहे. मात्र काही तज्ज्ञांनी ट्रम्प यांच्या प्रकृतीबाबत शंका उपस्थित केली आहे. त्यांच वय जास्त असल्याने ट्रम्प हे हाय रिस्क गटात मोडतात त्यामुळे डॉक्टरांना जास्त काळजी घ्यावी लागत आहे.
ट्रम्प यांनी प्रवास केलेल्या Air Force Oneच्या केबिनमध्येही व्हायरसची बाधा
ध्या त्यांच्यावर आर्मी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र पुढचे 48 तास ट्रम्प यांच्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत. अमेरिकेत एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचार सुरू आहेत अशा परिस्थिती ट्रम्प यांना कोरोना झाल्यामुळे त्यांच्या प्रचार सभादेखील रद्द करण्यात आल्या आहेत.
कोरोनाव्हायरसची लागण झाल्याने शनिवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे हेल्थ बुलेटिन जारी करण्यात आलं. त्यानुसार पुढचे 48 तास ट्रम्प यांच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कशा पद्धतीने केला जातोय कोरोनावरील उपचार?
म्प यांची खासगी सल्लागार कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी स्वत: ला क्वारंटाइन केलं होतं. त्यानंतर कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ट्रम्प लवकरात लवकर बरे होऊन पुन्हा प्रचारासाठी उभे राहावेत अशी प्रार्थना अनेकांनी केली आहे.