'किती बेकार हवा आहे!' चीन आणि रशियाबरोबर भारताच्या हवेलाही ट्रम्पनी ठरवलं वाईट, नेमकं काय आहे सत्य?

'किती बेकार हवा आहे!' चीन आणि रशियाबरोबर भारताच्या हवेलाही ट्रम्पनी ठरवलं वाईट, नेमकं काय आहे सत्य?

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतीय हवा खूप वाईट असल्याचं वक्तव्य केलं आणि याविषयी चर्चा सुरू झाली. खरंच भारताची हवा इतकी अशुद्ध आहे का? जाणून घ्या..

  • Share this:

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या (US presidential election 2020) प्रचाराने जोर धरला आहे. डोनाल्ड ट्रम्पविरुद्ध  (Donald Trump) जो बायडन (Joe Biden) अशी लढत असून सध्या ट्रम्प यांनी प्रचारादरम्यान केलेलं भारताविषयीचं एक वक्तव्य चर्चेत आहे. भारत किती खराब (filthy) आहे, असं ट्रम्प म्हणाले. तेव्हा त्यांना भारतातल्या हवेच्या दर्जाबद्दल (air quality in india) शेरा मारायचा होता. भारताबरोबर रशिया आणि चीनची हवाही अशुद्ध असल्याचं ट्रम्प यांनी एका जाहीर चर्चेत सांगितलं. खरंच किती वाईट हवा आहे आपल्या देशात? काय आहे सत्य?

एका जाहर चर्चेमध्ये (Debate) डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत, चीन आणि रशियामधील हवा सर्वात अशुद्ध असल्याचं म्हटलं. पॅरिस करारामधून अमेरिकेने घेतलेली माघार योग्य असल्याचं म्हणत ट्रम्प यांनी हे विधान केलं आहे. त्यामुळे खरंच या देशांमधील हवा खराब आहे का की ट्रम्प त्यांच्या  विधानाला काही महत्त्व नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तीन देशांचं वायूप्रदूषणातील स्थान

जगभरातील देशांचा विचार करायचा झाल्यास प्रदूषणाच्या बाबतीत आईक्युएयरच्या माहितीनुसार PM 2.5 नुसार भारत पाचव्या स्थानावर आहे. चीन या यादीमध्ये अकराव्या स्थानावर असून रशिया 81 व्या क्रमांकावर आहे. PM 2.5 नुसार विचार केला तर भारतात 58.08 तर चीनची 39.12 आणि रशियाची 9.85 पीएम लेवल आहे. तर यामध्ये अमेरिकेची केवळ 9.04 पीएम लेव्हल आहे.

भारताची परिस्थिती

प्रदूषणाच्या दृष्टीने भारताची स्थिती खूप गंभीर आहे. 2019 मध्ये जगभरातल्या 30 प्रदूषित शहरांमध्ये भारतातल्या २ शहरांचा समावेश होता. भारतात उद्योगांमधून 51 टक्के, वाहनांमधून 27 टक्के, शेतीच्या धुरामधून 17 टक्के तर फटाक्यांमधून 5 टक्के प्रदूषण होतं.

चीनने सुधारणा केली

चीनने मागील काही वर्षांमध्ये आपल्या देशातील प्रदूषणामध्ये खूप सुधारणा केली आहे. अनेक शहरांमध्ये पीएम लेव्हलमध्ये घट झाली असून बीजिंगची पीएम लेव्हल देखील खूप कमी झाली आहे.

रशियाची स्थिती खूप उत्तम नाही

रशियात परिस्थिती खूप वाईट नसली तर खूप चांगलीदेखील नाही. पण भारत आणि चीनच्या तुलनेत रशियामधील परिस्थिती खूपच उत्तम आहे. परंतु रशियाच्या हवामान आणि पर्यावरण विभागानुसार,143 शहरांमधील 5.6 कोटी नागरिक खराब हवेमध्ये श्वास घेत आहेत.

अमेरिकादेखील खुश नाही

अमेरिकेत देखील पर्यावरण आणि प्रदूषणाची स्थिती फार उत्तम नाही. अमेरिकेतील औद्योगिक शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी खूप वाढली आहे. भारत, रशिया आणि चीनमधील परिस्थितीपेक्षा अमेरिकेतील पातळी कमी असली तरी अमेरिका याबाबतीत खुश दिसत नाही.

ट्रम्प यांचं स्पष्टीकरण

जागतिक हवामान बदल करारात नमूद केल्याप्रमाणे प्रयत्न होत नसल्याने अमेरिका समाधानी नाही म्हणून आम्ही यातून माघार घेत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर चीन आणि भारताने प्रदूषण कमी करण्यासाठी काहीही प्रयत्न केले नसल्याचा आरोपदेखील अमेरिकेने केला आहे.

कोणाची जबाबदारी किती

ट्रम्प यांनी या पॅरिस करारातून माघार घेतल्यानंतर त्याच्यावर प्रचंड टीका करण्यात आली होती. यामध्ये जागतिक हवामान बदलासाठी निधी देण्यावरून हा वाद सुरु झाला आहे. सर्व देशांची यामध्ये समान जबाबदारी असल्याचे म्हणत अमेरिकेने यामधून माघार घेतली होती.

मागील दोन-तीन वर्षांपासून औद्योगिक कारणांमुळे प्रदूषणामध्ये वाढ झाल्याचे अमेरिका आणि इतर विकसित राष्ट्रांनी म्हटले आहे. पॅरिस करारामधून माघार घेण्याचं ते प्रदूषण हे कारण सांगत आहेत. त्याचबरोबर हवामान बदल कार्यक्रमात भारत आपली जबाबदारी पार पाडत आहे पण विकसित देश यातून जबाबदारी झटकू शकत नाहीत.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: October 23, 2020, 10:01 PM IST

ताज्या बातम्या