• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • 9 पेट्रोल चालकांना गंडा लावणारा अखेर गजाआड, पेट्रोलची टाकी फुल करुन व्हायचा पसार

9 पेट्रोल चालकांना गंडा लावणारा अखेर गजाआड, पेट्रोलची टाकी फुल करुन व्हायचा पसार

काही दिवसांपूर्वी त्यानं नंदीगाममधल्या पेट्रोल पंपावर आपल्या फोर्ड एंडेव्हर गाडीमध्ये 59 लिटर डिझेल भरलं होतं. नेहमीच्या सवयीप्रमाणं त्यानं पैसे देताच पळ काढला होता.

  • Share this:
वलसाड, 27 सप्टेंबर: गाडीत डिझेल भरून घेऊन पैसे न देताच पळ काढून पेट्रोल पंप चालकांची फसवणूक करणाऱ्या एका तरुणाला गुजरातमधल्या भिलड पोलिसांनी अटक केली आहे. धवलसिंह जडेजा असं त्या तरुणाचं नाव आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातल्या पेट्रोल पंपावर त्याने असा गुन्हा केला होता. या घटनेचं सीसीटीव्हीमध्ये चित्रण झालं होतं. या प्रकरणी पेट्रोल पंप मालकानं तक्रार दाखल केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, धवल प्रामुख्याने वलसाड जिल्ह्यातून जाणाऱ्या अहमदाबाद-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरच्या पेट्रोल पंपांवर असं कृत्य करायचा. विविध पेट्रोल पंपांवर तो आपली कार घेऊन इंधन भरण्यासाठी जात असे. मात्र आपण पकडले जाऊ नये यासाठी गुन्हा करण्यापूर्वी तो चलाखी करत असे. आपल्या कारची नंबर प्लेट नजरेस पडू नये म्हणून ती तो कापडानं झाकून ठेवत होता. कारची टाकी भरून झाल्यानंतर पैसे न देताच तो पळ काढत असे. आतापर्यंत त्याने एकूण नऊ पेट्रोलपंप चालकांना अशा प्रकारे फसवल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. आता भिलड पोलिसांनी त्याला गजाआड केलं आहे. हेही वाचा- हरियाणातील सुलतान रेड्याचा दुर्देवी अंत; एका जत्रेत 21 कोटींमध्ये विकण्याची केली होती मागणी काही दिवसांपूर्वी त्यानं नंदीगाममधल्या पेट्रोल पंपावर आपल्या फोर्ड एंडेव्हर गाडीमध्ये 59 लिटर डिझेल भरलं होतं. नेहमीच्या सवयीप्रमाणं त्यानं पैसे देताच पळ काढला होता. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध भिलड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. सीसीटीव्हीच्या आधारे तपास करून त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. अटक केलेला तरुण, धवलसिंह जडेजा हा गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातल्या उमरगाम तालुक्यातल्या फणसा गावचा रहिवासी आहे. विशेष म्हणजे त्याच्या कुटुंबाचा बांधकाम व्यवसाय असून तो अतिशय सुखवस्तू कुटुंबातला आहे. तरीदेखील धवल चोरी आणि फसवणुकीसारखे गुन्हे करत असल्याचं निदर्शनास आलं आहे. गुन्हे करण्यामागे असलेलं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हेही वाचा- PM मोदींची Central Vista कंस्ट्रक्शन साइटला अचानक भेट; बांधकामाचा घेतला आढावा, पाहा PHOTOS गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. जवळपास देशभरातील सर्वचं ठिकाणी दर शंभरी पार करून गेले आहेत. या पार्श्वभूमीवर धवलसिंह जाडेजासारख्या भामट्यांमुळे पेट्रोल पंप चालकांनी ग्राहकांना सेवा देताना काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
Published by:Pooja Vichare
First published: