मराठी बातम्या /बातम्या /विदेश /सत्ताबदल करण्यासाठी ट्रम्प यांची आणखी एक चाल, पेंटागॉनमध्ये केले बदल

सत्ताबदल करण्यासाठी ट्रम्प यांची आणखी एक चाल, पेंटागॉनमध्ये केले बदल

अमेरिकेत सत्तापालट झाले असले तरी डोनाल्ड ट्रम्प यांनी अद्याप पराभव मान्य केला नाही आहे. बायडन हेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणार हे निकालावरून स्पष्ट झाले आहे. मात्र आता अशी चर्चा आहे की,  ट्रम्प यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच त्यांना अटक केली जाणार आहे. (फोटो-AP)

अमेरिकेत सत्तापालट झाले असले तरी डोनाल्ड ट्रम्प यांनी अद्याप पराभव मान्य केला नाही आहे. बायडन हेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणार हे निकालावरून स्पष्ट झाले आहे. मात्र आता अशी चर्चा आहे की, ट्रम्प यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच त्यांना अटक केली जाणार आहे. (फोटो-AP)

जो बायडन यांनी निवडणूक जिंकली आणि सत्ता बदलण्याच्या योजनेवर त्यांचे काम सुरू असताना दुसरीकडे, डोनाल्ड ट्रम्प यांनी अद्याप पराभव मान्य केला नाही आहे.

वॉशिंग्टन, 12 नोव्हेंबर : जो बायडन (Joe Biden) यांनी अमेरिकेची निवडणूक जिंकली असली, तरी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अद्याप पराभव स्वीकारला नाही आहे. याआधी मतमोजणीवर आक्षेप घेत अमेरिकेची निवडणूक प्रक्रिया आणि सोशल मीडियावर जो बायजन यांच्या विजयावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. मात्र यातच आता ट्रम्प सत्ताबदल करण्याच्या तयारी असल्याचे दिसत आहेत.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार ट्रम्प प्रशासनाकडून संरक्षण विभागात मोठ्या प्रमाणात बदल केले जाण्याचे कारण हेच आहे. ट्रम्प प्रशासनाने पेंटागॉनमधील सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांना हटवण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या जागी आता ट्रम्प यांच्या निष्ठावंतांची बदली केली जात असल्याचे वृत्त आहे. याआधी ट्रम्प प्रशासनानं संरक्षण सचिव मार्क एस्पर यांना त्यांच्या पदावरून काढून टाकले होते.

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात कांटे की टक्कर झालेली पाहायला मिळाली. जो बायडन यांनी निवडणूक जिंकली आणि सत्ता बदलण्याच्या योजनेवर त्यांचे काम सुरू असताना दुसरीकडे, डोनाल्ड ट्रम्प यांनी अद्याप पराभव मान्य केला नाही आहे. दरम्यान, अमेरिकेचे निर्वाचित परराष्ट्रमंत्री पोंपिओ म्हणाले की, सत्तांतरण शांततेत पार पडेल आणि डोनाल्ड प्रशासन लवकरच आपला दुसरा कार्यकाळ सुरू करेल.

वाचा-राष्ट्राध्यक्षपदावरून पायउतार होताच मेलानिया ट्रम्प यांना घटस्फोट देणार?

ट्रम्प यांच्या भाचीनेही दिले तख्तपालटचे संकेत

अमेरिकेतील सत्तांतराचे संकेत ट्रम्प यांची भाजी मेरी ट्रम्पने दिले होते. मेरीनं ट्वीट करत, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बायडन कायदेशीर व निर्णायकपणे जिंकले आहेत. डोनाल्ड ट्रम्प आपला विजय दाखविण्यासाठी कोणतेही खोटे बोलू शकत नाहीत किंवा स्पिन करू शकत नाही. आता निवडणुकीचे निकाल बदलता येणार नाहीत. जागरुक रहा - हा तणावपूर्ण प्रयत्न आहे.

वाचा-जो बायडन यांचं India कनेक्शन; मुंबई-नागपूरशी आहे नातं

पेंटागॉनमधून अने वरिष्ठ अधिकाऱ्यांना काढले

ट्रम्प प्रशासनातून संरक्षण सचिव (संरक्षणमंत्री) मार्क एस्पर यांना काढून टाकल्यापासून अनेक वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या बदली करण्यात आल्या आहेत. ट्रम्प प्रशासनाकडून ज्या पद्धतीने निर्णय घेतले जातात ते पाहिल्यानंतर सैन्य नेतृत्व आणि नागरी अधिकाऱ्यांमध्ये चिंता वाढत आहे. एस्पर यांना काढून टाकल्यानंतर आणखी चार वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनाही हकलण्यात आले आहे.

First published:

Tags: Donald Trump, Joe biden, US elections