वॉशिंग्टन, 11 नोव्हेंबर : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर (US Presidential Election 2020) जो बायडन (Joe Biden) हे नवीन अध्यक्ष बनल्याच्या बातमीने दुःखी झालेल्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या वैयक्तिक जीवनाशी संबंधित काही बातम्या समोर येत आहेत. त्यात एक बातमी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. पत्नी मेलानिया ट्रम्प (Melania Trump divorce news) व्हाइट हाउस सोडल्या सोडल्या घटस्फोट घेणार आहेत, असं काही माध्यमांनी म्हटलं आहे. ट्रम्प यांचं अध्यक्षपद गेल्यानंतर खरंच मेलानिया ट्रम्प त्यांना घटस्फोट देतील का असे प्रश्न उभे राहत आहेत. व्हाईट हाऊस सोडल्यानंतर 15 वर्षांचा हा संसार मोडणार का? 75 वर्षांचे ट्रम्प पुन्हा एकदा घटस्फोट देणार का? याविषयी चर्चा, अफवा यांना पेव फुटलं आहेय हे खरोखरच सत्य आहे का ? जर सत्य असेल तर मेलानिया ह्या ट्रम्प यांना घटस्फोट का देऊ इच्छित आहेत? मेलानिया यांनी ट्रम्प हे या निवडणुकीत पराभूत होईपर्यंत वाट का बघितली? हा निर्णय त्यांनी आधीच का नाही घेतला? असेही अनेक प्रश्न उपस्थित होतात. याविषयी आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये काय काय प्रसिद्ध झालंय ते आधी पाहू… नात्यात खरोखरच होती धुसफूस ? मेलानिया आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात भांडणाच्या बातम्या काही नवीन नाहीत. असंही म्हटलं जातं की, मेलानिया यांनी वॉशिंग्टनला शिफ्ट होण्यासाठी पाच महिने घेतले होते. कारण दिलं होतं - मुलगा बॅरनच्या शाळेच्या वेळापत्रकात काही अडचणी येऊ नयेत. पण हे किती खरं होतं माहीत नाही. कारण त्याच वेळी मायकल वोल्फ यांनी आपल्या ‘फायर अँड फ्युरी’ पुस्तकात असं लिहिलं आहे की, ‘ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर मेलानियाच्या डोळ्यात आनंदाश्रू नाहीतर दुःखाचे अश्रू होते.’
या सगळ्या गोष्टी कितपत खऱ्या आहेत याबद्दल काहीच सांगता येणार नाही.परंतु या जोडप्यातील भांडणं कित्येक प्रसंगी कॅमेरामध्ये कैद झाली होती. याशिवाय मेलानिया बऱ्याच वेळा ट्रम्पविरुद्ध वक्तव्य करतानासुद्धा दिसून आल्या. उदाहरणार्थ मेलानिया ट्रम्प यांचं म्हणणं होतं की, अमेरिकेच्या निवडणुका या प्रामाणिकपणे झाल्या पाहिजेत. बेकायदेशीर मतं मोजली जाऊ नयेत. इतकंच नव्हे तर निवडणुकांचे निकाल येताच मेलानिया म्हणाल्या की, ‘ट्रम्प यांनी आता हार मान्य केली पाहिजे.’ जर हे तणाव असेच सुरू होते तर मग मेलानिया यांनी याचवेळी घटस्फोट घेण्याचा निर्णय का घेतला ? घटस्फोट घेण्याचं टायमिंग**?** ट्रम्प यांच्या पराभवावर आणि अमेरिकेच्या निवडणुकीच्या निकालांवर मेलानिया यांचा निर्णय अवलंबून होता का? हा मेलानिया यांचा संधीसाधूपणा असू शकतो का? न्यूमन यांच्या म्हणण्यानुसार जर मेलानिया यांनी यापूर्वी घटस्फोटाचा निर्णय घेतला असता ट्रम्प यांनी त्यांच्या पदाचा वापर करून अनेक प्रकारे त्यांना त्रास दिला असता. आणि अतिशय कठीण परिस्थिती निर्माण केली असती. म्हणून आता ट्रम्प यांचे पद गेलं आहे तर मेलानिया या घटस्फोटाचा निर्णय घेऊ शकतात. मेलानिया यांच्या पूर्वीच्या एका खास मित्राने बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत तर मेलानिया यांचं ट्रम्पशी लग्नच मुळी व्यवहारातून झालं होतं. Fake News की कोणतं अफेअर**?** मेलानिया घटस्फोटाचा निर्णय घेत आहेत या गोष्टीला ट्रम्प यांचे सल्लागार जेसन मिलर यांनी फेक न्यूज म्हटलंय. दुसरीकडे या कथेच्या मागे आणखी एक अँगल दिसून येत आहे डेली मेलच्या वृत्तानुसार असे कळते की मेलानिया लग्नानंतर या गोष्टीवर अडून होत्या की आपला मुलगा बॅरेन याला ट्रम्प यांच्या मालमत्तेचा समान वाटा मिळावा. त्यामध्ये असंही म्हटले जात आहे ट्रम्प या गोष्टीमुळे नाराज होते म्हणूनच त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये मेलानियांची आणि आपली बेडरूम स्वतंत्र ठेवली होती. माध्यमांनी मेलेनिया यांचं दुसरं अफेअर सुरू असल्याचे दावेही केले होते. अशा खूप गोष्टी समोर येत आहेत ज्यातून असे दावे केले जात आहेत की मेलानिया ट्रम्प यांच्यापासून घटस्फोट घेणार आहेत पण ही बातमी कितपत खरी आहे हे काळच सांगेल. या कथेची दुसरी बाजू ट्रम्प यांचे सहकारी आणि समर्थक या घटस्पोटाच्या बातमीला फेक न्यूज असं म्हणत आहेत. मेलानिया यांनी बऱ्याच वेळा आपल्या पतीचं कौतुक केलं आहे. तसंच बऱ्याच भाषणांच्या वेळेस त्यांनी आपल्या पतीच्या चांगल्या गुणांची वाखाणणी केली आहे. तसंच खूप गोष्टींमध्ये त्यांची मदत सुद्धा केली आहे. त्या पत्नी म्हणून त्यांना कायम पाठिंबा देत आल्या आहेत. असं सांगत ही घटस्फोटाची बातमी फेक न्यूज असल्याचं ट्रम्प यांचे निकटवर्तीय म्हणत आहेत.