US Election2020 : बायडन यांची संपत्ती किती? एका भाषणासाठी घेतात 74 लाख

US Election2020 : बायडन यांची संपत्ती किती? एका भाषणासाठी घेतात 74 लाख

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प (Donald Trump) यांचं मोठं उद्योग साम्राज्य आहे आणि ते प्रचंड श्रीमंत आहेत हे सर्वांना माहीत आहे. पण सध्या आघाडीवर असलेले बायडन (Joe Biden) यांच्या संपत्तीविषयी थोडं जाणून घेऊ या.

  • Share this:

वॉशिंग्टन, 5 नोव्हेंबर : अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक (US Presidential Election 2020) खूपच चुरशीची झाली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन (Joe Biden) की रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पुढचे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष होणार हे अजून निश्चित झालेलं नाही. मतमोजणी अजून सुरूच आहे. पण सद्यस्थितीला नेटवर्क 18 च्या अधिकृत वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीनुसार बायडन यांना 253 इलेक्टोरल वोट मिळाली असून ट्रम्प यांना 213 इलेक्टोरल वोट मिळाली आहे. बहुमतासाठी 270 इलेक्टोरल वोटची गरज असते. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचं मोठं उद्योग साम्राज्य आहे. ते बिझनेस एम्परर आहेत आणि प्रचंड श्रीमंत आहेत हे सर्वांना माहीत आहे. पण सध्या आघाडीवर असलेले बायडन यांच्या संपत्तीविषयी (Joe Biden net worth) थोडं जाणून घेऊया.

डेमोक्रॅटिक पक्षाच्या बायडन यांनी सगळी अमेरिका त्यांच्या जो या टोपणनावानेच ओळखते. ते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सत्तेत असताना उपाध्यक्ष होते आणि ते अरबपती आहेत. निवडणुकीपूर्वी बायडन यांनी 2016,17,18 या तीन वर्षांतील जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार त्यांच्याकडे 9 मिलियन डॉलरच्या जवळपास म्हणजे 64.2 कोटी रुपये इतकी संपत्ती असल्यचा अंदाज फोब्ज मासिकाने व्यक्त केला आहे.एका सामान्य कार सेल्समनच्या पोटी जन्मलेले जो यांनी जीवनात अनेक संकटांना तोंड दिलं आणि पुढे जात राहिले.

कुठून आले इतके पैसे

बायडन 1973 पासून 2009 पर्यंत सिनेटर होते. नंतर ते उपाध्यक्ष झाले. सिनेटर असताना त्यांचा वार्षिक पगार 42,500 डॉलरपासून (31 लाख रुपये) वाढून 174,000 (1.3 कोटी रुपये) डॉलर झाला.उपाध्यक्षपदावर असताना त्यांनी दरवर्षी अंदाजे 230,000 डॉलर (1.7 कोटी रुपये) कमवले.

पुस्तकं आणि भाषणांतून मोठी रक्कम

उपाध्यक्षपद सोडल्यावर त्यांनी पुस्तकं लिहिण्यासाठी भरपूर पैसे घेऊन करार केले आणि भाषणांतूनही पैस कमवायला लागले.

बायडन यांची संपत्ती नोव्हेंबर 2009 मध्ये 30,000 डॉलरहून कमी होती पण उपाध्यक्ष झाल्यावर ती वेगाने वाढली. जुलै महिन्यात जो यांनी सांगितलं की त्यांची पत्नी जिल आणि त्यांनी मिळून 2017, 2018 मध्ये 15 मिलियन डॉलरहून (112 कोटी रुपये) अधिक संपत्ती कमवली आहे.

फ्लटिरान बुक्सशी पुस्तकं लिहिण्यासाठी केलेल्या करारातून त्यांना 08 मिलियन डॉलर मिळाले.  बायडन एका भाषणासाठी 74 लाख रुपये घेतात. बायडन यांनी काही भाषणं मोफत केली होती असंही न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तात म्हटलं आहे. त्यांना पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात शिकवल्याबद्दल 540,000 डॉलरचं (11.5 कोटी रुपये) मानधनही मिळालं आहे. त्यांच्या पत्नी जिल यांनी स्पष्ट केलंय की बायडन जरी अमेरिकेचे अध्यक्ष झाले तरीही त्या कम्युनिटी कॉलेजमध्ये शिक्षिका म्हणून काम करत राहणार आहेत.

रियल इस्टेटमध्येही गुंतवणूक

बायडन यांची डेलव्हरमध्ये दोन घरं असून त्यांची किंमत 04 मिलियन डॉलर आहे. त्याचबरोबर रोख आणि गुंतवणूक मिळून 04 मिलियन डॉलर आहेत. त्यांना 01 मिलियन डॉलरची पेन्शन मिळते.

अध्यक्ष झाल्यावर किती पैसे मिळतील

बायडन अमेरिकेचे अध्यक्ष झाले तर त्यांना वार्षिक 400,000 डॉलर (2.98 कोटी रुपये) पगार मिळेल. देशाचे कमांडर इन चीफ म्हणून 50,000 डॉलरही मिळतील.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: November 5, 2020, 5:26 PM IST

ताज्या बातम्या