Home /News /videsh /

US Election 2020 : जो बायडन यांचा 'मेजर'ही व्हाईट हाऊसमध्ये जाण्याची करतोय तयारी; तो ही रचणार इतिहास

US Election 2020 : जो बायडन यांचा 'मेजर'ही व्हाईट हाऊसमध्ये जाण्याची करतोय तयारी; तो ही रचणार इतिहास

जो बायडन सध्या राष्ट्राध्यक्षपदावर आल्यानंतर काय काय करायचं हे ठरवत असताना त्यांचा कुत्रा मेजरही काही मागे नाही

    वॉशिंग्टन, 9 नोव्हेंबर : नुकत्याच पार पडलेल्या अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीमध्ये (US Election 2020) डेमोक्रेटिक पक्षाच्या जो बायडन (Joe Biden) यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे बायडन आपली पत्नी आणि अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडन त्यांच्यासह व्हाईट हाऊसमध्ये रहायला जाणार आहेत. पण केवळ जो बायडन आणि त्यांच्या पत्नीच व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश करणार नसून जर्मन शेफर्ड जातीचे बायडन यांचे दोन पाळीव श्वान देखील प्रवेश करणार आहेत. चॅम्प आणि मेजर अशी या दोन श्वानांची नावे आहेत. त्यामुळे पेनिसिल्वेनियामधून वॉशिंग्टनमध्ये पुढील वर्षी राहायला जाणार आहेत. दोन्हीही श्वान आधीपासूनच सोशल मीडियावर सेलिब्रिटी असून जो बायडन राष्ट्रपती होण्याआधी देखील दोघे सोशल मीडियावर लोकप्रिय आहेत. बायडन यांच्या प्रचारादरम्यान देखील त्यांच्या पुढच्या पायांत बायडन यांचे बॅनर अडकवून प्रचार करतानाचे या कुत्र्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. जो बायडन यांच्या विजयामुळे व्हाईट हाऊसमध्ये पुन्हा एकदा श्वानांचा प्रवेश होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या कालखंडात व्हाईट हाऊसमध्ये श्वान नव्हते. परंतु बायडन हे काही श्वान घेऊन जाणारे पहिले राष्ट्रपती नाहीत. त्यांच्याआधी देखील राष्ट्रपतींनी श्वान व्हाईट हाऊसमध्ये नेले आहेत. परंतु दत्तक घेतलेले श्वान घेऊन जाणारे बायडन हे पहिलेच राष्ट्रपती ठरले आहेत.  क्लिंटन अध्यक्ष असताना त्यांनी एक दत्तक घेतलेली मांजर व्हाइट हाउसमध्ये नेली होती. हे ही वाचा-चीनसह या मोठ्या देशांनी दिल्या नाहीत बायडेन यांना विजयाच्या शुभेच्छा जिल यांनी जो यांना 2008 मध्ये उपराष्ट्राध्यक्ष झाल्याबद्दल चॅम्प हा कुत्रा गिफ्ट दिला होता. बराक ओबामा यांच्या कार्यकाळात बायडन त्यावेळी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष होते. त्यामुळे या दोन श्वानांमधील चॅम्प याने याआधीच व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश केला आहे. पण मेजरची व्हाईट हाऊसमध्ये जाण्याची ही पाहिलीच वेळ आहे. त्याचबरोबर दत्तक घेतलेला पहिलाच श्वान आहे जो व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश करणार आहे. 7 तारखेला बायडन यांचा विजय घोषित झाल्यानंतर त्यांच्या दोन्ही श्वानांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. बायडन यांनी मेजर याला डेलावेर ह्युमन असोसिएशनकडून 2018 मध्ये दत्तक घेतले होते. चॅम्प या श्वानाचे सोशल मीडियावर अकाउंट असून त्याचे 9000 फॉलोअर्स देखील आहेत. त्यामुळे राष्ट्राध्यक्षांनी व्हाईट हाऊसमध्ये घेऊन जाणाऱ्या प्राण्यांमध्ये लोकप्रिय आहेत. माजी राष्ट्रपतींनी यापूर्वी व्हाईट हाऊसमध्ये खूप विचित्र प्राणी नेले होते. याआधी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांनी व्हाईट हाऊसमध्ये पोनी, एक बॅजर आणि अस्वल पाळले होते. दरम्यान, व्हाइट हाऊसमध्ये प्रवेश करणारा मेजर हा पहिला दत्तक श्वान आहे, परंतु तो पहिला आश्रित प्राणी नाही. माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या कुटुंबियांनी 'सॉक्स' नावाच्या काळ्या-पांढर्‍या मांजरीला दत्तक घेतले होते.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Joe biden, US elections

    पुढील बातम्या