मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

 चीनसह या मोठ्या देशांनी दिल्या नाहीत बायडेन यांना विजयाच्या शुभेच्छा, दिलं हे कारण

 चीनसह या मोठ्या देशांनी दिल्या नाहीत बायडेन यांना विजयाच्या शुभेच्छा, दिलं हे कारण

अमेरिकेतलं नवं सरकार दोन्ही देशांमधला तणाव कमी करण्यासाठी मार्ग काढेल असं चीनच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे. मात्र शुभेच्छा देण्यास  त्यांनी टाळाटाळ करत तांत्रिक कारण दिलं.

अमेरिकेतलं नवं सरकार दोन्ही देशांमधला तणाव कमी करण्यासाठी मार्ग काढेल असं चीनच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे. मात्र शुभेच्छा देण्यास त्यांनी टाळाटाळ करत तांत्रिक कारण दिलं.

अमेरिकेतलं नवं सरकार दोन्ही देशांमधला तणाव कमी करण्यासाठी मार्ग काढेल असं चीनच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे. मात्र शुभेच्छा देण्यास त्यांनी टाळाटाळ करत तांत्रिक कारण दिलं.

  • Published by:  Ajay Kautikwar
बीजिंग 9 नोव्हेंबर: जो बायडेन (Joe Biden) विजयी झाल्यानंतर जगभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. मात्र फक्त काही देश त्याला अपवाद ठरले. रशिया, चीन आणि मेक्सिको (russia china mexico) या देशांनी अजुनही बायडेन यांना शुभेच्छा दिल्या नाहीत. यात रशिया आणि चीन हे जगातले बलाढ्य देश आहेत आणि त्यांचे अमेरिकेशी असलेले संबंध कमालीचे तणावाचे आहेत. त्यामुळे ही भविष्यातल्या संघर्षाची नांदी समजली जाते. अमेरिकेतल्या निवडणूक निकालांची स्पष्टता अजुन झालेली नाही असं चीनच्या परराष्ट्रमंत्रालयाच्या प्रवक्त्याने सोमवारी सांगितलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी अजुनही आपला पराभव स्वीकारलेला नाही. त्यांनी निकालांविरुद्ध कोर्टात जाण्याची घोषणा केली आहे. मात्र जो यांना प्रचंड बहुमत मिळाल्याने ते अध्यक्ष होणार हे स्पष्ट झालं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी त्याना शुभेच्छा दिल्या. आंतरराष्ट्रीय संकेतांचा आणि शिष्टाचाराचा तो एक भाग समजला जातो. मात्र रशिया आणि चीनने तांत्रिक कारण देत हा शिष्टाचार पाळला नाही. बायडेन हे रशियाच्याबाबतीत जास्त कठोर असल्याचं समजलं जातं. रशिया हा अमेरिकेचा मोठा शत्रू आहे असं त्यांनी प्रचारात म्हटलं होतं. अमेरिकेतलं नवं सरकार दोन्ही देशांमधला तणाव कमी करण्यासाठी मार्ग काढेल असं चीनच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे. मात्र शुभेच्छा देण्यास  त्यांनी टाळाटाळ करत तांत्रिक कारण दिलं. पराभवाने बिथरलेले ट्रम्प चीन विरुद्ध मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दरम्यान, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बाइडेन यांनी सत्ता हाती घेण्यास सुरुवात केली आहे. CNNच्या अहवालानुसार, त्यांनी सत्ता हाती घेताच बाइडेन डे-वन एक्जिक्यूटिव ऑर्डरद्वारे डोनाल्ड ट्रम्प यांचे अनेक मोठे निर्णय मागे घेणार आहेत. बाइडेन 20 जानेवारी रोजी शपथ घेतील आणि त्यापूर्वी त्यांनी सत्ता आपल्या हाती घेण्याची तयारी सुरू केली आहे. बाइडेन आणि हॅरिस यांनी यासाठी BuildBackBetter.com ही वेबसाईट आणि @Transition46 हे ट्विटर अकाउंट तयार केले आहे. दुसरीकडे, ट्रम्प अजूनही हार मानण्यास तयार नाहीत, अजूनही त्यांना निकालावर शंका आहे. या अहवालानुसार, बाइडेन यांचे पहिले लक्ष कोरोना महामारीच्या आजारावर लक्ष केंद्रित करणे आहे. त्याच्या प्रचारामधील सर्वात मोठे वचन म्हणजे लवकरात लवकर साथीच्या आजारावर नियंत्रण आणले जाईल. बाइडेन लवकरच 12 सदस्यांची कोरोना व्हायरस टास्क फोर्स बनवू शकतात आणि त्याची पूर्ण जबाबदारी भारतीय वंशाचे डॉक्टर विवेक मूर्ती यांच्याकडे सोपणार असल्याचे कळतंय. निवडणुकीतील अपयशानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी मिळाली चक्क जॉबची ऑफर यासोबतच बाइडेन पुन्हा डॉक्टर अँथनी फॉसीची सेवा घेऊ शकतात. ट्रम्प यांच्या विदेश नीतीशी संबंधित अनेक निर्णयांशी ते सहमत नसल्याचे बायडेन यांनी स्पष्ट केलं आहे. असे मानले जातं की आपला पदभार संभाळताच बाइडन हे डे-वन एक्जिक्यूटिव ऑर्डरद्वारे अनेक मोठे निर्णय बदलणार आहेत.
First published:

Tags: China, Joe biden

पुढील बातम्या