US Election 2020 : राष्ट्राध्यक्ष होताच बायडेन उचलणार मोठं पाऊल; ट्रम्प यांना बसणार जोरदार झटका

US Election 2020 : राष्ट्राध्यक्ष होताच बायडेन उचलणार मोठं पाऊल; ट्रम्प यांना बसणार जोरदार झटका

बायडेन यांच्या निर्णयामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसणार आहे

  • Share this:

वॉशिंग्टन, 9 नोव्हेंबर : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बाइडेन यांनी सत्ता हाती घेण्यास सुरुवात केली आहे. CNNच्या अहवालानुसार, त्यांनी सत्ता हाती घेताच बाइडेन डे-वन एक्जिक्यूटिव ऑर्डरद्वारे डोनाल्ड ट्रम्प यांचे अनेक मोठे निर्णय मागे घेणार आहेत. बाइडेन 20 जानेवारी रोजी शपथ घेतील आणि त्यापूर्वी त्यांनी सत्ता आपल्या हाती घेण्याची तयारी सुरू केली आहे. बाइडेन आणि हॅरिस यांनी यासाठी BuildBackBetter.com ही वेबसाईट आणि @Transition46 हे ट्विटर अकाउंट तयार केले आहे. दुसरीकडे, ट्रम्प अजूनही हार मानण्यास तयार नाहीत, अजूनही त्यांना निकालावर शंका आहे.

या अहवालानुसार, बाइडेन यांचे पहिले लक्ष कोरोना महामारीच्या आजारावर लक्ष केंद्रित करणे आहे. त्याच्या प्रचारामधील सर्वात मोठे वचन म्हणजे लवकरात लवकर साथीच्या आजारावर नियंत्रण आणले जाईल. बाइडेन लवकरच 12 सदस्यांची कोरोना व्हायरस टास्क फोर्स बनवू शकतात आणि त्याची पूर्ण जबाबदारी भारतीय वंशाचे डॉक्टर विवेक मूर्ती यांच्याकडे सोपणार असल्याचे कळतंय. यासोबतच बाइडेन पुन्हा डॉक्टर अँथनी फॉसीची सेवा घेऊ शकतात. ट्रम्प यांच्या विदेश नीतीशी संबंधित अनेक निर्णयांशी ते सहमत नसल्याचे बायडेन यांनी स्पष्ट केलं आहे. असे मानले जातं की आपला पदभार संभाळताच बाइडन हे डे-वन एक्जिक्यूटिव ऑर्डरद्वारे अनेक मोठे निर्णय बदलणार आहेत.

हे ही वाचा-पराभवाने बिथरलेले ट्रम्प चीन विरुद्ध मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित केले गेले आहे

बाइडेन यांच्या टीमने ट्रांजिशन वेबसाइटमध्ये कोरोना व्हायरस, आर्थिक मजबुती, वांशिक (racial) समानता आणि क्लाइमेट चेंज या चार गोष्टींवर प्रामुख्याने जोर दिले आहे. डेमोक्रॅट्सने जाहीर केलेल्या गोष्टींमध्ये असे म्हटले आहे की पहिल्या दिवसापासून (20 जानेवारी 2021) आम्ही या आव्हानांवर लक्ष ठेवू. असे सांगितले जात आहे की बाइडन यांना असे मंत्रिमंडळ तयार करायचे आहे जे देशाची विविधता दाखवू शकेल. कोरोनाशी लढा देण्यात ट्रम्प अपयशी ठरल्याचा मुद्दा बाइडेन यांनी निवडणुकीत जोरात मांडला होता. याचसोबत बाइडेन पॅरिस क्लाइमेट करारामध्ये ही पुन्हा सामील होण्याचा विचार करत आहे. सर्वात मोठा निर्णय म्हणजे मुस्लिम देशांतील नागरिकांवर लादलेल्या ट्रॅव्हल बंदीच्या ट्रम्प यांच्या आदेशाला मागे घेऊ शकतात.

Published by: Meenal Gangurde
First published: November 9, 2020, 7:22 PM IST

ताज्या बातम्या