पराभवाने बिथरलेले ट्रम्प चीन विरुद्ध मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, बायडेन यांच्या अडचणी वाढवणार

पराभवाने बिथरलेले ट्रम्प चीन विरुद्ध मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, बायडेन यांच्या अडचणी वाढवणार

ट्रम्प अध्यक्ष झाल्यापासून अमेरिका आणि चीनचे संबंध कधी नव्हे एवढे फाटले आहेत. दोन्ही देशांमध्ये व्यापार युद्धाही भडकल्याने त्यात आणखी भर पडली.

  • Share this:

वॉशिंग्टन 9 नोव्हेंबर: जो बायडेन (Joe Biden) हे अमेरिकेचे नवे अध्यक्ष असणार हे आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप (Donald Trump) सध्या बिथरलेले आहेत. ट्रम्प हे सहजा सहजी व्हाईट हाऊस (White House) सोडतील असं दिसत नाही. बायडेन हे 20 जानेवारीला अध्यक्षपदाची शपथ घेतील. तोपर्यंत ट्रम्प यांच्याजवळ एक महिन्याचा कालावधी आहे. त्या काळात ट्रम्प हे चीन (China)  विरुद्ध काही मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त ANIने दिलं आहे. तसं झालं तर नवे अध्यक्ष बायडेन यांच्या अडचणी वाढणार आहेत.

ट्रम्प अध्यक्ष झाल्यापासून अमेरिका आणि चीनचे संबंध कधी नव्हे एवढे फाटले आहेत. दोन्ही देशांमध्ये व्यापार युद्धाही भडकल्याने त्यात आणखी भर पडली. त्यात पुन्हा कोरोनाचं संकट आल्याने ही कटुता वाढली आहे. कोरोना हा चायना व्हायरस असून जगावर आलेल्या या संकटाला चीनच जबाबदार आहे असे जाहीर आरोप ट्रम्प यांनी वारंवार केले आहेत.

जॉर्जटाउन विद्यापीठाचे सीनियर फेलो जेम्स ग्रीन यांच्या मतानुसार, 20 जानेवारीनंतर अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. बायडेन हे इराण आणि चीनच्या संदर्भात नरमाईचं धोरण घेऊ शकतात. तर सौदी अरेबिया, तुर्कस्थान, उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांच्या विरोधात ते आक्रमक भूमिका घेऊ शकतात.

तर ट्रम्प हे सहजपणे सत्ता सोपवतील अशी शक्यता कमीच आहे. त्याआधीच ते चीनबद्दल काही मोठा निर्णय घेऊन खळबळ उडविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ट्रम्प यांनी अजुनही आपला पराभव खुलेपणाने मान्य केला नाही. न्यायालयात जाण्याचा त्यांनी इशारा दिलेलाच आहे

Published by: Ajay Kautikwar
First published: November 9, 2020, 5:25 PM IST
Tags:

ताज्या बातम्या