वॉशिंग्टन, 21 सप्टेंबर : कोरोना न लस न घेतलेल्यांना अनेक ठिकाणी प्रवेश नाकारला जात आहेत. अगदी बडे नेतेही याला अपवाद ठरले नाहीत. देशात सर्वोच्च स्थानी असलेल्या राष्ट्राध्यक्षांनाही लस न घेतल्याने रेस्टॉरंटने प्रवेश नाकारला आणि फुटपाथवरच खाण्याची वेळ राष्ट्राध्यक्षांवर ओढावली. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो (Brazil president Jair bolsonaro) अमेरिकेत रस्त्यावर पिझ्झा खाताना दिसले (Jair bolsonaro eats pizza on footpath). ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो कायम वादात राहिले आहेत. त्यांनी कोरोना लस घेतलेली नाही. कोरोना लस न घेताच ते अमेरिकेत पोहोचले आहेत. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या (United Nations General Assembly - UNGA) 76 व्या अधिवेशनासाठी ते गेले आहेत. न्यूयॉर्कमध्ये ते बिनधास्तपणे फिरताना दिसत आहेत. हे वाचा - ‘Corona Vaccination म्हणजे स्कॅम’ म्हणत या अभिनेत्याने नाकारली लस अमेरिकेतील हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये लस घेतलेल्यांना प्रवेश आहे. त्यांना आपल लस प्रमाणपत्र दाखवावं लागतं. लस न घेतलेले बोल्सोनारो तिथल्या एका रेस्टॉरंटमध्ये खाण्यासाठी गेले पण तिथं त्यांच्याकडे लस घेतल्याचं प्रमाणपत्र नसल्याने त्यांना रेस्टॉरंटमध्ये घेतलं नाही. तेव्हा त्यांनी इतर मंत्र्यांसोबत रस्त्यावरच पिझ्झा खाल्ला. त्यांच्या कॅबिनेटमधील मंत्र्यांनी हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. बोलसोनारो गेल्या वर्षीपासूनच कोरोना लशीला विरोध करत आहेत. आपली रोगप्रतिकारक शक्ती इतकी मजबूत आहे की आपण कोरोनाव्हायरसचा सामना करू शकतो, असा दावा त्यांनी याआधी केला. हे वाचा - कोरोनामुक्त रुग्णाला काढावी लागली किडनी आणि फुफ्फुस; जगातील पहिलं प्रकरण भारतात बोल्सोनारो यांनी कोरोनाव्हायरसलाही गांभीर्याने घेतलं नव्हतं. सतत कोरोना विषाणूच्या धोक्यास साधा फ्लू म्हणून कमी लेखत होते. त्यांनी बर्याच वेळा जाहीरपणे सांगितले होते की, या विषाणूचा फारसा परिणाम होणार नाही. त्यांनी मास्क घालण्याच्या नियमांसह इतर नियमही शिथील केले होते. त्यानंतर गेल्यावर्षी जुलैमध्ये त्यांनाच कोरोनाची लागण झाली होती. कोरोनातून बरं झाल्यानंतर त्यांना फुफ्फुसाचं गंभीर इन्फेक्शनही झालं होतं. फुफ्फुसामध्ये मोल्ड झाल्यास सांगितलं आहे. त्यांच्या फुफ्फुसात मोल्ड म्हणजे बुरशी झाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.