मराठी बातम्या /बातम्या /विदेश /Russia Ukraine War: ''युद्धात युक्रेनचा पराभव झाला तर युरोपही...'', झेलेन्स्की यांचं मोठं वक्तव्य

Russia Ukraine War: ''युद्धात युक्रेनचा पराभव झाला तर युरोपही...'', झेलेन्स्की यांचं मोठं वक्तव्य

Volodymyr Zelensky

Volodymyr Zelensky

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेन्स्की (Ukrainian President Volodymyr Zelensky) यांनी रशिया युक्रेनमध्ये (Russia Ukraine War) सुरु असलेल्या युद्धादरम्यान युरोपला गंभीर इशारा दिला आहे.

नवी दिल्ली, 6 मार्च: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेन्स्की (Ukrainian President Volodymyr Zelensky) यांनी रशिया युक्रेनमध्ये (Russia Ukraine War) सुरु असलेल्या युद्धादरम्यान युरोपला गंभीर इशारा दिला आहे.

गेल्या सात ते आठ दिवसांपासून रशिया युक्रेनमधल्या प्रमुख शहरांवर हल्ला करत आहे. यामुळे युक्रेनमध्ये मोठी हानी झाल्याचं पाहायला मिळत आहे. युद्धामुळं एकीकडे युक्रेनमध्ये (Ukraine) मोठी विनाशकारी स्थिती निर्माण झालेली असतानाच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेन्स्की यांनी संपूर्ण युरोपलाच निर्वाणीचा इशारा दिला आहे.

राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेन्स्की यांनी युक्रेन टिकले नाही तर संपूर्ण युरोप टिकणार नाही. असा गंभीर इशारा दिला. तसेच, आंदोलकांना गप्प बसू नका. रस्त्यावर उतरा आणि युक्रेनला पाठिंबा द्या. आमच्या स्वातंत्र्याचे समर्थन करा. असे आवाहन करत हा केवळ रशियन सैन्यावरचा विजय नसेल तर अंधारवर प्रकाशाचा विजय असेल. वाईटावर चांगल्याचा विजय होईल. असे सूचक वक्तव्य झेलेन्स्की यांनी केले.

तसेच, झेलेन्स्की यांनी नाटोला त्यांच्या देशावरील हवाई क्षेत्र नो फ्लाय झोन म्हणून घोषित करण्याची विनंती केली होती. नाटोचे म्हणणे आहे की, नो फ्लाय झोन घोषित करुन, सर्व अनधिकृत विमानांना युक्रेनवर बंदी घातली जाईल. त्यामुळे अण्वस्त्रांनी सज्ज रशियासोबत युरोपीय देशांचे मोठ्या प्रमाणावर युद्ध होणार आहे. म्हणून नाटो देशांनी अद्याप असा निर्णया घेतलेला नाही.

दरम्यान, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शनिवारी पुन्हा एकदा धमकी दिली आहे. ब्रिटेनच्या एका मंत्र्याच्या हवाल्याने पुतिन यांनी नाटोला धमकी दिली आहे. ते म्हणाले नाटो युद्धात सामील होऊ शकते. त्याचवेळी पुतिन म्हणाले, युक्रेनला नो फ्लाय झोन घोषित करणे म्हणजे युद्धाच्या घोषणेसारखे आहे. यापुर्वी नाटोने युक्रेनला नो फ्लाय झोन म्हणून घोषित करु शकते असे म्हटले होते.

सध्या सगळ्या जगाला चिंतेच्या दरीत लोटलं आहे ते रशिया (Russia-Ukraine War) आणि युक्रेनमधील युद्धाने. रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे. युक्रेन त्याला सर्व शक्तीनिशी तोंड देण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकेसारखे (USA) देश युक्रेनच्या बाजूने उभे आहेत. हे युद्ध लवकर थांबलं नाही तर युक्रेनच्या बाजूने काही देश या युद्धात उतरतील तर काही देश रशियाच्या बाजूने. अखेर याची परिणती तिसर्‍या महायुद्धात होण्याची भीती आहे.

सध्या सगळं जग तिसऱ्या महायुद्धाच्या (World War) तोंडावर उभं आहे. त्यामुळे पुतिन (Putin) यांनी युद्ध थांबवावं अशी मागणी जगभरातील लोक करत आहेत. मात्र पुतिन यांनी कोणत्याच आवाहनाला प्रतिसाद दिलेला नाही. अशा परिस्थितीत हे युद्ध कधी आणि कसं संपणार असा प्रश्न जगभरातील लोकांना भेडसावत आहे.

First published:
top videos

    Tags: President Vladimir Putin, Russia Ukraine, Russia's Putin, Vladimir putin